मराठी बातम्या /बातम्या /religion /

अंबाबाईचा प्रसाद : मंदिराच्या ग्रंथालायाला मिळाली 18 व्या शतकातील दुर्मिळ हस्तलिखत

अंबाबाईचा प्रसाद : मंदिराच्या ग्रंथालायाला मिळाली 18 व्या शतकातील दुर्मिळ हस्तलिखत

संदर्भ ग्रंथालयासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे शके 1786 आणि शके 1795 या कालखंडातील हस्तलिखित ग्रंथ प्राप्त झाले आहेत.

संदर्भ ग्रंथालयासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे शके 1786 आणि शके 1795 या कालखंडातील हस्तलिखित ग्रंथ प्राप्त झाले आहेत.

संदर्भ ग्रंथालयासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे शके 1786 आणि शके 1795 या कालखंडातील हस्तलिखित ग्रंथ प्राप्त झाले आहेत.

  • Local18
  • Last Updated :
  • Kolhapur, India

कोल्हापूर, 24 नोव्हेंबर : कोल्हापूरच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या श्री करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराची ख्याती दूरवर पसरली आहे. हे मंदिराच्या ऐतिहासिक दृष्टया प्राचीन तर आहेच पण या मंदिराला बऱ्याच मोठ्या प्रमाणात अध्यात्मिक महत्त्व आहे. येथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. अनेक भक्तांना मंदिराचा आणि कोल्हापूर शहराचा इतिहास जाणून घेण्याची इच्छा असते. यामुळेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून अंबाबाई मंदिर संदर्भ ग्रंथालय उभे करण्यात येणार आहे. या संदर्भ ग्रंथालयासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडे शके 1786 आणि शके 1795 या कालखंडातील हस्तलिखित ग्रंथ प्राप्त झाले आहेत.

या संदर्भ ग्रंथालयासाठी शके 1786 मधील गुरुचरित्राची प्राकृत ओवीबद्ध रचना असलेला हस्तलिखित ग्रंथ जगदीश गुळवणी या भाविकाने देणगी स्वरुपात सुपूर्द केला आहे. त्याचबरोबर शके 1795 च्या कालखंडातील गुरुचरित्राची प्रत धर्माधिकारी या भाविकाने दिली आहे, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी दिली आहे.

Kolhapur : देशातील एकमेव मातृलिंग मंदिर, वर्षातून फक्त 3 वेळा उघडतात दरवाजे, Video

प्राकृत भाषेतील हा शके 1786 मधील हस्तलिखित ओवीबध्द ग्रंथ हा नृसिंह गुरुचरित्र ग्रंथ असून तो हस्तलिखित स्वरुपातील असल्यामुळे दुर्मिळ आहे. 9 इंच बाय 4 इंच आकाराच्या या ग्रंथांची सहाशे ते आठशे पाने हस्तलिखित स्वरुपात आणि चांगल्या अवस्थेत आहेत. हा गुरुचरित्र ग्रंथ म्हणजे गाणगापूर, नरसिंहवाडी तसेच कारंजा येथील मध्ययुगीन कालखंडातील दत्त विभूती महाराज यांचे चरित्र आहे.

हे हस्तलिखित पूर्वीच्या काळातील कागदावर नैसर्गिक शाईने लिहिण्यात आले आहे. अशा हस्तलिखित ग्रंथांचा संदर्भांचा वापर करत पुस्तक निर्माण होत असते. त्याचबरोबर धर्माधिकारी या भाविकाने दिलेली शके 1795 च्या कालखंडातील एक गुरुचरित्राची प्रत आहे. ती देखील देवस्थानच्या संदर्भ ग्रंथालयासाठी त्यांनी सुपुर्द केली आहे,असे धर्मशास्त्र मार्गदर्शक तथा पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सहाय्यक व्यवस्थापक गणेश नेर्लेकर-देसाई यांनी सांगितले आहे.

Margashirsha Guruvar : इको फ्रेंडली कमळात करा देवीची स्थापना, पाहा Video

2000 हून अधिक संदर्भ ग्रंथ आणणार

देवस्थान समितीच्या वतीने उभारण्यात येणाऱ्या संदर्भ ग्रंथालयासाठी जोरदार तयारी सुरू आहे. या ग्रंथालयात वाराणसी येथून 2000 हून अधिक संदर्भ ग्रंथ आणण्यात येणार आहेत. तर देवस्थापन समितीकडून वेद, वेदांग, वेदांत, योगशास्त्र, नीतीशास्त्र, नित्योत्सव, धर्मशास्त्र, शिवशास्त्र, शैवागमन, शक्तिआगम, पुराण, व्याकरण, कर्मकांड आदींसह बऱ्याच विषयांवरील धर्मग्रंथ मागविण्यात आले आहेत.

ग्रंथ हस्तलिखित जमा करण्याचे आवाहन

भाविकांकडे आणखी काही माहिती किंवा असे ग्रंथ, हस्तलिखित असतील, तर ते त्यांनी मंदिराच्या संदर्भ ग्रंथालयासाठी द्यावेत, असे आवाहनही पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवडे यांच्याकडून करण्यात आले आहे.

First published:

Tags: Kolhapur, Local18