वर्धा, 05 डिसेंबर : दुचाकी असो वा चारचाकी, कुठल्याही वाहनाचा विमा काढणे बंधनकारक आहे. विमा नसल्यास वाहनांची पुननोंदणी केली जात नाही. असे वाहन बेकायदा ठरते. त्यामुळे वाहनांचा विमा काढण्याची नितांत गरज आहे. वर्ध्यात मागील दहा महिन्यांत विमा न काढलेल्या 42 चालकांवर कारवाई करून 80 हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. यासाठी वाहतुकीसंदर्भात अनेक नियम आहेत. जर निमांचे उल्लंघन झाले तर तुम्हाला हजारोंचा दंड लागू शकतो.
वाहनाचा विमा नसल्यास मोटार वाहन कायद्यानुसार 2 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात येतो. मात्र, दुचाकीचा विमा हा केवळ 1500 ते 1700 रुपयांचाच होत असून, विम्यापेक्षा दंडाची रक्कम जास्त असल्याने नागरिकांनी वाहनांचा विमा काढणे आवश्यक आहे. रस्त्यावर धावणाच्या दुचाकी, चारचाकी, तीनचाकी आदी सर्वच वाहनांचा विमा काढणे आवश्यक आहे. विनाविमा वाहने रस्त्यावरून चालवू नये, असे स्पष्ट आदेश वाहतूक विभागाचे आहे. त्यामुळे सर्वच वाहनांना विमा आवश्यक आहे. अन्यथा कारवाई केली जाणार आहे.
दुचाकीलाही विमा का आवश्यक?
मागील दहा महिन्यांत विमा न काढलेल्या 42 चालकांवर कारवाई करून 0हजार 500 रुपयांचा दंड ठोठावला आहे. यापैकी 13 चालकांकडून 26 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर 29 वाहनचालकांना ई-चलान देऊन 54 हजार500 रुपयांचा दंड ठोठावल्याची माहिती वाहतूक पोलीस विभागाकडून देण्यात आली. दुचाकीचा जर अपघात झाला तर त्याला विम्याचे कवच असते. त्यामुळे विमा असणे आवश्यक आहे. जर अपघाती मृत्यू झाल्यास विम्याचा लाभ संबंधित व्यक्तीला मिळतो. त्यामुळे दुचाकीलाही विमा असणे आवश्यक आहे.
मुंबईकरांनो, घराबाहेर पडण्यापूर्वी वाचा पुढील 3 दिवसांच्या वाहतूकीमधील बदल
5000 पर्यंतचा दंड
ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर 1000 रुपये दुचाकीसाठी आणि तीन-चाकी वाहनांसाठी 2000 रुपये तर चारचाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी (LMV) 5000 रुपयांचा दंड आहे. तसेच वाहनाची नोंदणी नसेल तर दुचाकीसाठी 2000, तीन-चाकी वाहनांसाठी 3000, चारचाकी आणि हलकी मोटार वाहनांसाठी 5000 तर इतर प्रकारच्या वाहनांसाठी ओव्हरलोडिंग 5000 आणि अतिरिक्त 2000 प्रती टन, गती नियमांचे उल्लंघन केले तर दुचाकीसाठी 1000, तीन-चाकी आणि चारचाकी किंवा हलकी मोटार वाहनांसाठी 2000 रुपये दंड आहे.
साताऱ्याच्या रँचाेंचा भन्नाट आविष्कार! तयार केली ऊसाच्या इंधनावर चालणारी गाडी
वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलीस विभागाकडून कारवाई केली जात आहे. दररोज कारवाई करून लाखोंचा दंड वसूल केला जातो आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम नागरिकांनी पाळणे गरजेचे आहे, अशी माहिती रवींद्र रेवतकर, वाहतूक पोलीस निरीक्षक, वर्धा यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.