जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Video : साताऱ्याच्या रँचाेंचा भन्नाट आविष्कार! तयार केली ऊसाच्या इंधनावर चालणारी गाडी

Video : साताऱ्याच्या रँचाेंचा भन्नाट आविष्कार! तयार केली ऊसाच्या इंधनावर चालणारी गाडी

Video : साताऱ्याच्या रँचाेंचा भन्नाट आविष्कार! तयार केली ऊसाच्या इंधनावर चालणारी गाडी

चक्क उसापासून इंधन तयार करून बाईकचे भन्नाट जुगाड तयार करण्याचा आविष्कार साताऱ्यातील विक्रांत पवार या तरुणानं केला आहे.

  • -MIN READ Local18 Satara,Satara,Maharashtra
  • Last Updated :

    सातारा, 03 डिसेंबर : भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत असल्यानं सामान्यांना घाम फुटला आहे. अशातच चक्क उसापासून इंधन तयार करून बाईकचे भन्नाट जुगाड तयार करण्याचा आविष्कार साताऱ्यातील   विक्रांत पवार या तरुणानं केला आहे. विशेष म्हणजे ही गाडी अवघ्या  65 रुपयात  50 किलोमीटर अंतर धावू शकते. विक्रांतच्या या आविष्काराचे सर्वत्र कौतूक होत असून त्याला अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. साताऱ्यातील अरविंद गवळी कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकणाऱ्या विक्रांत पवारने वयाच्या 18 व्या वर्षीच सुमारे दीड वर्षाच्या अतोनात प्रयत्नातून उसापासून तयार होणाऱ्या हायड्रोजन इथेनॉलवर चालणारी गाडी बनवली आहे. गाडीसाठी लागणारे इंधन देखील विक्रांतनेच बनवले असल्याचे विक्रांतने सांगितले आहे. पेट्रोलच्या वाढत्या किमती आणि त्याचा दिवसेंदिवस होत चाललेला कमी पुरवठा यावर पर्याय म्हणून विक्रांतची गाडी चोख काम बजावू शकते. भविष्यातील गरज लक्षात घेऊन विक्रांतने दीड वर्षांपूर्वीच्या मेहनतीनं भन्नाट गाडी बनवली आहे. ही गाडी उसापासून तयार हायड्रोजन इथेनॉल इंधनावर चालते. हे इंधन द्रव व वायू या दोन स्वरूपात आहे. पेट्रोल हे निसर्गनिर्मित असल्याने त्याचे साठे संपल्यानंतर संपूर्ण जगासमोर नवीन इंधनाचा प्रश्न उभा राहणार आहे. विक्रांतने तयार केलेले इंधन हे उसापासून तयार होत असल्याने हे इंधन संपण्याचा धोका अजिबात नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आपला ऊस असे इंधन तयार करणाऱ्या कारखान्यांना दिल्यास त्यापासून मोठ्या प्रमाणात इंधन तयार करण्यास अडचण राहणार नाही. मात्र, यासाठी उसाच्या रसावर प्रक्रिया करणारे युनिट उभारावे लागणार आहे. Video : विद्यार्थ्यांनो सावधान! ‘ही’ चूक कराल तर गमवावी लागेल नोकरी एका लिटरमध्ये 50 किलोमीटर साखर कारखानदार जसा साखर उत्पन्नासाठी शेतकऱ्यांचा ऊस नेतो त्याच धर्तीवर या इंधनाच्या निर्मितीसाठी ऊस नेण्याची यंत्रणा उभारल्यावर शेतकऱ्यांना दोन्ही पर्याय खुले राहणार आहेत. विक्रांतने केवळ इंधनाचा शोध लावून थांबला नाही तर त्याने यासाठी एक दुचाकीचे मॉडेल तयार केले आहे. यासाठी त्याला मित्रांनीही मदत करून डिझाईनसाठी सहकार्य केले आहे. विक्रांतने तयार केलेल्या मोटरसायकलचे वजन 200 किलो असून ती एका लिटरमध्ये 50 किलोमीटर अंतर धावू शकते. तसेच हे इंधन तयार करण्यासाठी 65 रुपये खर्च होतो. अपंगत्व, परीक्षेतील अपयश बाजूला करत उभारला व्यवसाय, इतरांनाही देतोय रोजगार प्रयोगाचे पेटंट सादर विक्रांतने या गाडीच्या पेटंटसाठी अर्ज दाखल केला आहे. 18 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर त्याला पेटंटबाबतचे उत्तर मिळणार आहे. हे पेटंट जर त्याला मिळाले तर तो सातारा जिल्ह्यातील सर्वात कमी वयात पेटंट मिळवणारा पहिला तरुण ठरणार आहे. दोन डिसेंबर रोजी मलेशिया येथे घेण्यात आलेल्या ऑनलाईन कॉम्पिटिशनमध्ये विक्रांतला गोल्ड मेडल मिळाले आहे. तसेच शासनाकडून पुणे येथे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शासन तंत्र शिक्षण संचालनाच्या औद्योगिक संशोधन स्पर्धेत विक्रांतला पहिल्या क्रमांकाचे रोख दहा हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Local18 , satara
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात