मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /HSC Result : वडील दुकानात कामाला, ट्युशनची फी भरायलाही नव्हते पैसे, सोहमचं यश पाहून घरचे रडले

HSC Result : वडील दुकानात कामाला, ट्युशनची फी भरायलाही नव्हते पैसे, सोहमचं यश पाहून घरचे रडले

X
HSC

HSC Success Story : घरातील खडतर परिस्थितीवर मात करत वर्ध्यातील सोहम कोल्हटकरनं बारावीच्या परीक्षेत यश मिळवलंय.

HSC Success Story : घरातील खडतर परिस्थितीवर मात करत वर्ध्यातील सोहम कोल्हटकरनं बारावीच्या परीक्षेत यश मिळवलंय.

अमिता शिंदे, प्रतिनिधी

वर्धा, 26 मे :  विद्यार्थी जीवनातील महत्त्वाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाय. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांनी प्रतिकुल परिस्थितीमध्ये यश मिळवलंय. खडतर परिस्थितीमध्ये त्यांनी मिळवलेलं यश हे सर्वांनाच प्रेरणादायी आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये वर्ध्यातील सोहम मनोजराव कोल्हटकरचा समावेश आहे.

वर्ध्याच्या न्यू इंग्लिश ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी असलेल्या सोहमची घरची परिस्थिती अगदी बेताची होती. त्याचे वडील घड्याळ्याच्या दुकानात काम करतात. तर, आई गृहिणी आहे. त्यानं बारावीला एकही शिकवणी न लावता वर्गातील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि स्वअभ्यास या जोरावर बारावी सायन्समध्ये  94.50 टक्के मार्क्स मिळवले आहेत.

घरची परिस्थिती बेताची असल्यानं सोहमला ट्युशन, क्लासेसची फी भरणे त्याला परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यानं लायब्ररीत बसून अभ्यास केला. तसंच घरी बसून जुन्या प्रश्नपत्रिका सोडवत सराव केला. त्याच्या खडतर परिश्रमाला अखेर यश मिळालंय. सोहमला चांगले मार्क्स पडल्यानंतर त्याच्या घरातील मंडळींना अश्रू  अनावर झाले होते.

लहानपणी IAS अधिकाऱ्याने केला होता लेकाचा सत्कार, आईने ठरवलं अन् आज लेकाने करून दाखवलं!

मायग्रेनमध्ये दिली परीक्षा

सोहमच्या यशाची घौडदौड ही फक्त बारावीपूरती मर्यादीत नाही. त्याला मायग्रेनचा त्रास आहे. हा त्रास होत असतानाही त्यानं JEE ची परीक्षा दिला. या परीक्षेत त्यानं 96.8 टक्के मार्क्स मिळवले आहेत. तो आता जेईई ऍडव्हान्ससाठी कॉलिफाय झालाय. कॉम्पुटर इंजिनिअर होण्याचं सोहमचं स्वप्न आहे. त्यासाठी संपूर्ण मदत करण्याचा निर्धार कुटुंबीयांनी बोलून दाखवलाय.

First published:
top videos

    Tags: Career, HSC Result, Local18, Wardha