मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /UPSC Success Story : लहानपणी IAS अधिकाऱ्याने केला होता लेकाचा सत्कार, आईने ठरवलं अन् आज लेकाने करून दाखवलं!

UPSC Success Story : लहानपणी IAS अधिकाऱ्याने केला होता लेकाचा सत्कार, आईने ठरवलं अन् आज लेकाने करून दाखवलं!

X
युपीएससी

युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सांगलीच्या निहालचा आजवरचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेत शोभावा असा आहे.

युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सांगलीच्या निहालचा आजवरचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या कथेत शोभावा असा आहे.

स्वप्नील एरोंडलीकर, प्रतिनिधी

सांगली, 26 मे : आपल्या मुलानं मोठेपणी काय व्हावं याचं स्वप्न कित्येक आई-वडिलांनी पाहिलेलं असतं. काही जणांच्या बाबतीमध्येच ते खरं होते. सांगलीच्या निहाल कोरे या तरुणानं त्याचं आईचं स्वप्न खरं केलंय. निहाल नुकत्याच लागलेल्या युपीएससीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालाय. निहाल तिसरीमध्ये असताना त्याच्या आईनं पाहिलेलं  स्वप्न त्यानं पूर्ण केलंय.

काय होतं स्वप्न?

निहालचं युपीएसएसी परीक्षेतील यश हे एखाद्या संघर्षमय कथेसारखं आहे. लहानपणापासून हुशार असलेल्या निहालचा तिसरीमध्ये आयएएस अधिकारी रिचा बागला यांनी सत्कार केला होता. त्या कार्यक्रमानंतर मुलानंही सरकारी अधिकारी व्हावं असं स्वप्न त्याच्या आईनं पाहिलं. आईचं हे स्वप्न निहालनं पूर्ण केलंय.

निहालचा लक्ष्यपूर्तीपर्यंतचा प्रवास सोपा मुळीच नव्हता. इंजिनिअरिंग पूर्ण केल्यानंतर तो यूपीएससीची तयारी करत होता. या तयारीच्या दरम्यान त्यानं अर्थशास्त्रमधील पदवी पूर्ण केली. त्याचं लग्न झालं. लग्नानंतरही तो घरीच बसून यूपीएससीची तयारी करत होता. त्याला तब्बल 7 वेळा अपयश आलं. अगदी थोड्या मार्क्सनी त्याची संधी हुकली. त्यानंतरही निराश न होता त्यानं अखेर हे यश खेचून आणलंय. यावर्षी लागलेल्या युपीएससीच्या निकालात तो 922 व्या क्रमांकासह उत्तीर्ण झालाय.

भाजी विकून वडिलांनी शिकवलं, आज लेकाने UPSC पास करून दाखवलं

सात वेळा अपयश झाल्यानंतरही निहालनं न खचता जिद्दीनं अभ्यास केला आणि यश खेचून आणले. निहालला इतर लोकं चिडवत, नोकरी कर, बायकोच्या जीवावर जगू नकोस हा सल्ला देत. त्याकडे दुर्लक्ष करुन त्यानं अभ्यासावर लक्ष्य केंद्रीत केलं आणि हे यश मिळवलंय. आपल्या या यशात आई आणि पत्नीचाही मोठा वाटा असल्याचं निहालनं सांगितलंय.

First published:
top videos

    Tags: Career, Local18, Sangli, Success Story, UPSC