जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Holi 2023: होळीसाठी विविध रंगाने दुकाने सजली, वर्ध्यात 'या' रंगाला विशेष मागणी, Video

Holi 2023: होळीसाठी विविध रंगाने दुकाने सजली, वर्ध्यात 'या' रंगाला विशेष मागणी, Video

Holi 2023: होळीसाठी विविध रंगाने दुकाने सजली, वर्ध्यात 'या' रंगाला विशेष मागणी, Video

Holi 2023 Updates: महाराष्ट्रात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी आणि रंगपंचमीसाठी वर्ध्यातील बाजारपेठा विविद रंगांनी सजल्या आहेत.

  • -MIN READ Wardha,Maharashtra
  • Last Updated :

    वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी वर्धा, 4 मार्च : होळीच्या सणासाठी रंग आणि गुलालाच्या उत्सवाची वर्धा जिल्ह्यात जय्यत तयारी सुरू झाली आहे. शहरातील बाजारपेठा आणि चौकांमध्ये रंग, गुलाल, पिचकारी, मुखवटे, टोप्या आदी वस्तूंची दुकाने सजली आहेत. यासोबतच किराणा दुकानदारही विविध रंग, गुलाल, पिचकारी यांचा साठा करत आहेत. होळी सणाचा लोकांचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. सणाच्या बाजारात खरेदीसाठी गर्दी निश्चितच वाढणार आहे. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक असलेल्या होळीचे सामाजिक महत्त्व देखील आहे. हा असा सण आहे जेव्हा लोक आपसातील मतभेद विसरून एकत्र येतात. होळीमध्ये मतभेद आणि मनभेद दूर होतात. लाल रंग प्रेम आणि सौहार्दाचे प्रतीक आहे. त्यामुळे तो रंग लावल्यास वाद संपतात व सौहार्द वाढते, असे मानले जाते.

    News18लोकमत
    News18लोकमत

    नैसर्गिक रंगांना मागणी 6 मार्च रोजी होलिका दहन व पूजा करण्यात येईल. 7 मार्च रोजी रंगपंचमी साजरी होणार आहे. रंगपंचमीसाठी विविध रंग, गुलाल, पिचकारी, मुखवटे, टोप्या आदींची मागणी वाढली आहे. सततच्या जनजागृतीमुळे नागरिक आता केवळ नैसर्गिक रंग आणि हर्बल गुलालाची मागणी करत आहेत. खालीलप्रमाणे वस्तूंचे दर यावेळी पिचकारी 10 ते 1000 रुपये, मास्क 5 ते 200 रुपये, पुंगी, वॉटर बलून 5 ते 120 रुपये, केसांचे पंख 150 ते 250 रुपये, टोपी 15 ते 100 रुपये, नैसर्गिक रंग, हर्बल गुलाल, सुगंधित गुलाल, गुलाल स्प्रे, नॅचरल पेंट बाजारात 150 ते 1200 रुपयांपर्यंतच्या कॅनमध्ये उपलब्ध आहे. यावेळी बाजारात मेड इन इंडिया वस्तूंचा बोलबाला दिसून येत आहे. Beed News: ‘तिरंगा थाळी’तून महिलांसाठी फिटनेस मंत्रा, पाहा काय आहे खास, Video बाजारात मालाची मागणी वाढली पिचकारी, मास्क, पाण्याचा फुगा, केसांचा विग, ओपी, नैसर्गिक रंग, गुलाल आदी वस्तूंची मागणी खूप वाढली आहे. हा सर्व माल दिल्लीतून येतो, मागणीच्या तुलनेत पुरवठा खूपच कमी असतो. होळीला असताना पुन्हा बाजारात माल आणणे शक्य नसल्याने होळी सणाबाबत नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात