जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Beed News: 'तिरंगा थाळी'तून महिलांसाठी फिटनेस मंत्रा, पाहा काय आहे खास, Video

Beed News: 'तिरंगा थाळी'तून महिलांसाठी फिटनेस मंत्रा, पाहा काय आहे खास, Video

Beed News: 'तिरंगा थाळी'तून महिलांसाठी फिटनेस मंत्रा, पाहा काय आहे खास, Video

बीड कृषी महोत्सवात तिरंगा थाळीने उत्तम आरोग्याचा मंत्र दिला. महिलांमधील अॅनिमियाचे प्रमाण कमी करण्यासाठी सकस आहाराची माहिती दिली.

  • -MIN READ Bid,Bid,Maharashtra
  • Last Updated :

    रोहित देशपांडे, प्रतिनिधी बीड, 3 मार्च: बीडमध्ये पाच दिवसीय जिल्हा कृषी महोत्सव झाला. या महोत्सवात बचत गटाच्या माध्यमातून विविध गृहउपयोगी वस्तूंचे स्टॉल लावले होते. यामध्ये सर्वाधिक लक्ष तिरंगा थाळीने वेधून घेतले. महिलांना आरोग्याचा मंत्र देणाऱ्या या थाळीत तीन रंगात विविध पदार्थ होते. बीड जिल्ह्यातील महिलांना ॲनेमिया मुक्त करण्यासाठी सकस आहार खाण्याचा संदेश या थाळीतून देण्यात येत होता. महिलांची आरोग्य तपासणी बीड जिल्ह्यातील महिला आर्थिक विकास महामंडळातर्फे आणि नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकास प्रकल्प अंतर्गत जिल्ह्यातील गावोगावी जाऊन महिलांची आरोग्य तपासणी केली जाते. यामध्ये महिलांचे हिमोग्लोबिन, मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड आदी तपासण्या करण्यात आल्या होत्या. या तपासणीत महिलांच्या आरोग्याबाबत धक्कादायक निष्कर्ष आले होते. महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण अधिक असल्याचे आढळून आले.

    News18लोकमत
    News18लोकमत

    आहार सकस नसल्याने अॅनिमिया महिलांमध्ये अॅनिमियाचे प्रमाण वाढण्यास त्यांचा आहार कारणीभूत आहे. महिलांच्या आहारात कडधान्ये, फळभाज्या, पालेभाज्या, फळे यांचे प्रमाण कमी असल्याचे आढळले. दैनंदिन आहार सकस नसल्याने महिलांना अशक्तपणाची समस्या जाणवते. त्यासाठी तिरंगा थाळीतून महिलांना सकस आहाराची माहिती देण्यात येत होती. तिरंगा थाळीतून सकस आहाराबद्दल माहिती कृषी महोत्सवात महिलांच्या आहाराबाबत जनजागृती करण्यासाठी तिरंगा थाळीचा स्टॉल लावण्यात आला होता. नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्योग विकासाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला. महिलांनी अॅनिमिया मुक्त व्हावे हा या जनजागृती मोहिमेचा उद्देश होता. ही थाळी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. Beed News: बर्फगोळ्यासोबत गाण्याची मेजवानी, बीडच्या विक्रेत्याची सर्वत्र चर्चा, Video तिरंगा थाळीत काय? तिरंगा थाळीच्या माध्यमातून दैनंदिन जीवनामध्ये नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत कुठल्या आहाराचे सेवन केले पाहिजे, हे सांगण्यात आले. थाळीमध्ये पालेभाज्या, फळभाज्या, डाळी, कडधान्य, फळे, दूध, शेंगदाण्याचा लाडू , मटकी, गावरान चने, नाचणीचा पापड, दूध, दही, फ्रुट सलाड, बाजरी भाकरी, ज्वारीची भाकरी, काजू, बदाम, गाजराचा हलवा, शेंगदाण्याचे लाडू यासारखे पदार्थ आहेत. प्रामुख्याने हिरवा, पांढरा आणि भगव्या रंगातील विविध फळे, भाज्या आणि खाद्य पदार्थांची ही थाळी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात