मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Wardha : पांढऱ्या सोन्याचा भाव पडला, खर्चही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत

Wardha : पांढऱ्या सोन्याचा भाव पडला, खर्चही निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत

कापसाचा भाव गेल्या महिनाभरापासून 8 ते 9 हजारांच्या दरम्यानच स्थिरावलेला आहे.

कापसाचा भाव गेल्या महिनाभरापासून 8 ते 9 हजारांच्या दरम्यानच स्थिरावलेला आहे.

कापसाचा भाव गेल्या महिनाभरापासून 8 ते 9 हजारांच्या दरम्यानच स्थिरावलेला आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Wardha, India

    वर्धा, 03 डिसेंबर : वर्धा  जिल्ह्यात यंदा  सततच्या पावसामुळे कापसाच्या उत्पादन कमालीची घट झाली आहे. त्यातच गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचे दरही घसरू लागले आहेत. कापसाचा भाव गेल्या महिनाभरापासून 8 ते 9 हजारांच्या दरम्यानच स्थिरावलेला आहे. उत्पन्न खर्चही मिळणे मुश्कील झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.  

    गेल्यावर्षी 14 हजार रुपयांवर पोहोचलेला कापसाचा भाव यावर्षी सुरुवातीपासूनच 9 हजारांच्या उंबरठ्यावर थांबलेला आहे. कापसाच्या भावात मंदी असल्याचे चित्र जिल्ह्याच्या बाजारपेठेत दिसून येत आहे. यावर्षी अतिवृष्टीमुळे कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे, असे असतानाही कापसाचा भाव मात्र गेल्या महिनाभरापासून 8 ते 9 हजारांच्या दरम्यानच स्थिरावलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मोठ्या कापूस बाजारपेठेत अजूनही आवक वाढलेली नाही.

    शेतकऱ्यांच्या मुलांना ऑलिम्पिकसाठी तयार करणारा आधुनिक द्रोणाचार्य, Video

    खासगी व्यापाऱ्यांनी दिवाळीनंतर कापूस खरेदी सुरू केली. आठ हजार रुपयांवर भाव जाहीर केला. मात्र, बाजारपेठेत अजूनही चित्र उदासीन आहे. जिल्ह्यात यावर्षी 2 लाख 27 हजार 623 हेक्टर क्षेत्रावर कपाशीची लागवड करण्यात आली होती. अतिवृष्टीमुळे 1 लाख 34 हजार 357 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. दिवाळीपासून खासगी व्यापाऱ्यांची खरेदी सुरू झाली असून, आतापर्यंत 8 लाख 52 हजार 347 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या प्रतीक्षेत कापूस थांबवून ठेवला आहे.

    पूरक व्यवसायावर परिणाम 

    वर्धा जिल्ह्याचे मुख्य पिक कापूस असून यंदा उत्पादनात घट येण्याची चिन्ह आहेत. अजूनपर्यंत कापूस बाजारात तेजी आलेली नाही. त्यामुळे गावातून जिनींगकडे कापूस आणण्याच्या गाड्यांना काम मिळालेले नाहीत. या मालवाहू गाड्या व त्यावर काम करणारे कामगार यांच्या उपजीविकेच्या साधनावर मोठा परिणाम दिसून येत आहे.

    लय भारी डोकं! शेतामध्ये चोरी होत होती म्हणून टेरेसवरच लावली भाजी, पाहा Video

    असा आहे बाजारभाव

    हिंगणघाट : 8600 ते 8930

    आर्वी : 8700 ते 8850

    वर्धा : 8850 ते 8950

    पुलगाव : 8900 ते 9000

    देवळी : 9000 ते 1205

    हमालांनाही फटका

    गेल्यावर्षी डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपर्यंत यंदा पेक्षा तीन पट अधिक कापूस खरेदी करण्यात आला होता. यंदा कापसाचे उत्पादन घटल्याने जिनींग प्रेसिंग फॅक्टरी व त्यामध्ये काम करणारे हमाल यांनाही हवे तसे काम अजून उपलब्ध झाले नाही अशी माहिती व्यापारी अशोक अग्रवाल यांनी दिली आहे.

    First published:

    Tags: Local18, Wardha