जाहिरात
मराठी बातम्या / मनी / कृषी / लय भारी डोकं! शेतामध्ये चोरी होत होती म्हणून टेरेसवरच लावली भाजी, पाहा Video

लय भारी डोकं! शेतामध्ये चोरी होत होती म्हणून टेरेसवरच लावली भाजी, पाहा Video

लय भारी डोकं! शेतामध्ये चोरी होत होती म्हणून टेरेसवरच लावली भाजी, पाहा Video

कोल्हापूरच्या शेतकऱ्यानं ‘लय भारी’ डोकं चालवत गच्चीवरच भाजीपाला पिकवण्यास सुरूवात केली आहे.

  • -MIN READ Local18 Kolhapur,Maharashtra
  • Last Updated :

    कोल्हापूर, 3 डिसेंबर: भाजीपाल्याचे भाव दररोज वाढत चालले आहेत. या भाववाढीमुळे शेतामधूनही बऱ्याचदा लागवड केलेली भाजी चोरण्याच्या घटना घडल्या आहेत. ही चोरी रोखण्यासाठी कोल्हापूरच्या शेतकऱ्यानं चक्क घराच्या छतावरच भाज्या पिकवत आहे. कमी खर्चात आणि कमी जागेत टेरेस गार्डनिंग करुन भरघोस नफा मिळवत आहेत. कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यात असणाऱ्या गारगोटी गावात हे प्रगतशील शेतकरी चंद्रकांत चव्हाण राहतात. स्वतःच्या शेतीत भात पीक पिकवून राज्यस्तरीय भात पीक स्पर्धा त्यांनी जिंकली होती. याबद्दल त्यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान देखील करण्यात आला आहे. त्यांनी यापूर्वी त्यांच्या शेतातही  भाजीपाला पिकवला. पण शेतात पिकवलेला भाजीपाला फारसा लाभत नसल्याचा अनुभव त्यांना आला होता. त्यामुळे त्यांनी घरच्या घरीच छतावर भाजी पिकवण्याचा त्यांनी निश्चय केला.  गेल्या 3 वर्षांपासून ते अशी टेसेस गार्डन शेती करत आहेत. कशी केली टेसेवर शेती ? चव्हाण यांनी सुरुवातीला चांगल्या प्रकारची माती आणून त्यात शेणखत मिसळले. ही माती उन्हात तापवली. तापवलेली माती पोत्यात भरुन टेरेसवर ठेवलसी. त्यात लावण्यासाठी चांगल्यापैकी रोप आणली. या रोपांना फक्त सुफला हे एकच रासायनिक खत वापरलं. Success Story : फेसबुकवरुन 7 लाख जणांना शेती शिकवणारी औरंगाबादची महिला रसायन विरहित आणि औषध फवारणी न करता चवदार भाजी खायला मिळावी, या हेतूने सुरवातीला मी ही टेरेस गार्डन शेतीची संकल्पना अंमलात आणली. मला पहिल्यावर्षी चांगली भाजी मिळाली. त्यामुळे गेली तीन वर्षे मी वर्षभर अशी भाजीपाल्याची शेती करतोय. टेरेसवर लावण्यात आलेल्या प्रत्येक भाजीचा वेगवेगळा हंगाम आहे. जसा त्यांचा बहर संपेल, तशी लगेच दुसऱ्या भाजीची लागवड मी करतो. त्यामुळे वर्षभर आम्हाला ही भाजी पुरते. घरी वापरल्यानंतर देखील शिल्लक राहणारा भाजीपाला मी बाहेर देत असतो. यामध्ये टोमॅटो, वांगे, कारले, ओली मिरची, दोडका अशा चार-पाच भाज्या दरवेळी मी लावत असतो, असे देखील चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. नोकरी सोडून सुरु केली खेकड्यांची शेती, आता करतोय लाखोंची कमाई! ज्यांच्या घरावर जागा असेल त्यांनी अशा पद्धतीने शेती केली, तर घरच्या घरीच चांगली, ताजी आणि रसायन विरहित भाजी त्यांना खायला मिळू शकते. त्यामुळे इतरांनी देखील नक्की प्रयत्न करावा, असे आवाहन देखील चंद्रकांत चव्हाण यांनी केले आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात