नाशिक 2 डिसेंबर : धनुर्विद्या,तिरंदाजी हा प्राचीन खेळ आहे.रामायण महाभारतात अनेक श्रेष्ठ धनुर्धर होते. आज हा खेळ फारसा लोकप्रिय नसला तरी ग्रामीण भागातील विशेषत: शेतकऱ्यांच्या मुलांना यामध्ये मोठा रस आहे. या मुलांची ही आवड लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्यातल्या एका प्रशिक्षकानं त्यांना चांगल्या दर्जाचं प्रशिक्षण देण्यास सुरूवात केलं. या आधुनिक द्रोणाचार्याच्या तालमीमध्ये अनेक तरुणांना नवं अवकाश प्राप्त झालंय. आधुनिक द्रोणाचार्य नाशिक जिल्ह्यातल्या आधुनिक द्रोणाचाऱ्याचं नाव प्रतिक थेटे आहे. त्यांनी प्रशिक्षण दिलेलं 98 जण राज्य पातळीवर तर 28 जण राष्ट्रीय पातळीवर खेळले आहेत. त्यांच्या विद्यार्थ्यांनं थेट आंतरराष्ट्रीय स्पर्धेत धडक मारत मारली. अर्थात प्रतिक यांचा हा प्रवास सोपा नव्हता.प्रतिक यांनी इथवर पोहचण्याची बरीच मेहनत घेतली आहे. वडिल शेतकरी असल्यानं त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. पण, त्यांना धुर्नविद्येची आवड असल्यानं त्यांनी यामध्येच करिअर करण्याचं ठरवलं. सुरूवातीच्या काळीत त्यांनी लाकडी धनुष्यबाणावर सराव केला. रोज आठ ते दहा तास ते सराव करत असतं. त्यानंतर त्यांनी आपल्या बरोबरीच्या शेतकरी मुलांसाठी शेतात धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्र सुरू करून त्यांना प्रशिक्षण देण्यास सुरूवात केली. फेसबुकवरुन 7 लाख जणांना शेती शिकवणारी औरंगाबादची महिला, Video ऑलिम्पिकचं स्वप्न आपल्या विद्यार्थ्यांनी ऑलिम्पिक गाजवानं अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी ते सर्वांकडून शिस्तबद्ध पद्धतीनं प्रशिक्षण देत आहेत. त्यांच्या या कष्टाचं चीज आता होऊ लागलंय. त्यांचे 98 विद्यार्थी राज्य पातळीवर, 28 प्रदेश तर 1 जण आंतराष्ट्रीय पातळीवर खेळला आहे. या विद्यार्थ्यांनी मेडलचीही कमाई केली आहे. ‘धनुर्विद्या खेळासाठी लागणाऱ्या एका धनुष्यबाणाची किंमत अडीच ते तीन लाख इतकी आहे. शेतकऱ्यांच्या मुलांना इतकी पैसे खर्च करणे शक्य नाही. या होतकरू खेळाडूंना सरकारनं मदत करावी,’ अशी मागणी प्रतिक यांनी केली आहे. सर्वांचा विरोध होता पण… किडनी देऊन पतीला वाचवणाऱ्या पत्नीनं सांगितली इमोशनल स्टोरी, Video गेल्या सहा वर्षांपासून मी प्रतिक थेटे सरांच्या मार्गदर्शानाखाली सराव करत आहे. माझे वडील शेतकरी आहेत. मी काहीतरी मोठं काम करावं अशी त्यांची इच्छा आहे. वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी मेहनत घेत आहे. मी आत्तापर्यंत 6 वेळा राष्ट्रीय पातळीवर खेळले असून प्रत्येक वेळी मेडल पटकावले आहे. ऑलिम्पिकमध्ये देशाचं प्रतिनिधत्व करण्याची संधी मिळावी यासाठी मी कठोर परिश्रम घेत असल्याचं प्रतिक यांची विद्यार्थीनी साक्षी ताठे यांनी सांगितलं. तुम्हाला प्रशिक्षण हवे असेल तर करा संपर्क प्रतिक थेटे अतिशय अल्प दरात मुलांना प्रशिक्षण देत आहेत.जर एखादा विद्यार्थी हा गरीब घरातील असेल तर त्याला अगदी मोफत प्रशिक्षण दिले जाते. कॉलेजातल्या आदिवासी मुलानं बांबूपासून बनवल्या आकर्षक वस्तू, पाहा Video अधिक माहितीसाठी :प्रतिक थेटे ( धनुर्विद्या प्रशिक्षक)स्व.मुकुंदराव पुंडलिक कातड,तिरंदाजी मैदान, गिरणारे रोड नाशिक.फोन नं : 9975824771 इथं संपर्क करावा
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.