मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /शेतकऱ्यांची कमाल; एका वर्षात सोयाबीनची तब्बल 3 पिके, पाहा Video

शेतकऱ्यांची कमाल; एका वर्षात सोयाबीनची तब्बल 3 पिके, पाहा Video

X
वर्धा

वर्धा जिल्ह्यात सोयाबीनची शेती केली जाते. महाबळ येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनची एका वर्षात तीन पिके घेतली आहेत.

वर्धा जिल्ह्यात सोयाबीनची शेती केली जाते. महाबळ येथील शेतकऱ्यांनी सोयाबीनची एका वर्षात तीन पिके घेतली आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Wardha, India

    वृषभ फरकुंडे, प्रतिनिधी

    वर्धा, 8 फेब्रुवारी: सर्वसाधारणपणे प्रत्येक पिकाचा हंगाम ठरलेला असतो. सोयाबीन हे पीक पावसाळ्यात घेतले जाते याबद्दल माहिती असेल. परंतु, वर्धा जिल्ह्यातील महाबळाच्या शेतकऱ्यांनी एक वेगळा प्रयोग केला आहे आणि तो यशस्वी झाला आहे. महाबळाचे शेतकरी पावसाळी, हिवाळी आणि उन्हाळी अशी सोयाबीनची वर्षातून 3 पिके घेत आहेत. विशेष म्हणजे सोयाबीनच्या उत्पन्नातही फार मोठी तफावत जाणवत नसल्याने हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरत आहे.

    सोयाबीन उत्पादनाकडे शेतकऱ्यांचा कल

    शेती हा व्यवसाय सतत अनिश्चित मानला जातो. शेतीमालाला किफायतशीर भाव मिळण्याची शाश्वती नसल्यामुळे शेती तोटय़ात जाते. एखाद्या शेतीमालाला बाजारात सुदैवाने चांगला भाव मिळत असेल आणि भविष्यातही चांगल्या भावासंबंधीचा अंदाज असेल तर शेतकरी त्या शेतीमालाच्या उत्पादनाला प्राधान्य देतात. यानुसारच यंदा सोयाबीन पिकाची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कमी कालावधीत, कमी खर्चात, कमी कष्टात आणि हमखास बाजारभाव मिळण्याच्या शाश्वतीमुळे वर्धातील शेतकरी सोयाबीनकडे मोठय़ा प्रमाणात वळत आहेत.

    TCS ची नोकरी सोडून पठ्ठ्यानं सुरू केली शेती, आज करतोय लाखोंची उलाढाल

    महाबळच्या शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग

    वर्धातील शेतकरी पावसाळी सोयाबीन करतात. सोयाबीनला चांगला दर मिळतो. त्यामुळे वर्धा शहराजवळील महाबळाच्या शेतकऱ्याने हिवाळी सोयाबीन घेण्याचा निर्णय घेतला. आधी गजानन भावरक या शेतकऱ्याने आपल्या शेतात दोन वेळा हे पीक घेतले. पावसाळी सोयाबीन काढून हिवाळी सोयाबीन पेरले. तेव्हा सोयाबीनच्या उत्पादनात कोणताही फरक न जाणवता चांगले पीक आले. पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी उन्हाळी सोयाबीन घेण्याचा निर्णय घेतला. तेव्हाही पीक चांगले आले.

    Rose Day 2023: गुलाब उत्पादकांची 'खुलली कळी', Valentine Week मध्ये आले अच्छे दिन, Video

    आता गावातील इतर शेतकऱ्यांनीही पावसाळी, हिवाळी आणि उन्हाळी सोयाबीन घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे गावात एकीकडे सोयाबीनची कापणी सुरू असते तर दुसरीकडे सोयाबीन उगवून तयार असते. या पिकाला विशेष मेहनत घेण्याची गरज नाही. पावसाळ्यातील सोयाबीनला जी मेहनत करावी लागते तशाच पध्दतीने मेहनत करून हे पीक वर्षातून 3 वेळा घेता येत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना या पीक पद्धतीचा चांगला लाभ होत आहे.

    First published:

    Tags: Agriculture, Local18, Wardha, Wardha news