नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा 13 जून : समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यात सुसाट कारच्या स्टेअरिंगवरुन चालकाचं नियंत्रण सुटल्याने अनियंत्रित कार थेट रस्ता दुभाजकावर धडकली. या अपघातात कारमधील दाम्पत्याचा मृत्यू झाला आहे. तर, चालक आणि दोन लहान मुलं गंभीर जखमी झाली आहेत. हा अपघात येळाकेळी येथून समोर गेलेल्या समृद्धी महामार्गावर पुलगाव नजीक झाला. या अपघाताची सावंगी पोलिसांनी नोंद घेतली. प्रियरंजनकुमार गोहित (37) आणि सोनी प्रियरंजन गोहीत (35) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर जखमींमध्ये चालक पेंदुकर इंद्रकुमार बैद, सान्वी गोहीत (8) आणि यीक्षीत गोहीत (4) यांचा समावेश असून त्यांच्यावर सावंगी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. प्रियरंजनकुमार गोहित हे मुळचे मधुबिना जिल्हा बिहार येथील रहिवासी आहेत. मात्र, ते पुणे येथे नोकरीवर होते. ते नागपूर येथून कारने मुंबईकडे जात होते. मात्र, गाडी चालवत असतानाच चालक पेंदुकर बैद याला डुलकी लागली. यामुळे त्याचं वेगात असलेल्या कारच्या स्टेअरिंगवरुन नियंत्रण सुटलं आणि कार थेट दुभाजकावर जाऊन आदळली. यात कारमधील पाचही जण गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ सावंगी येथील रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र दोघांचा मृत्यू झाला. Nashik News : समृद्धी महामार्गावर अपघात सुरूच, कार संरक्षक भींतीला धडकली; 4 ठार, 4 गंभीर जखमी या प्रकरणी सावंगी पोलिसांनी कार चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मंगळवारीही झालेला भीषण अपघात - समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. मंगळवारी मध्यरात्रीही समृद्धी महामार्गावर इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला. चालकाचं वाहानावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला. या अपघातामध्ये चार जण ठार तर चार जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी शिर्डीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. नातेवाईकांना हज यात्रेसाठी मुंबईल सोडून परत येत असताना ही अपघाताची घटना घडली होती..
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.