जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Nashik News : समृद्धी महामार्गावर अपघात सुरूच, कार संरक्षक भींतीला धडकली; 4 ठार, 4 गंभीर जखमी

Nashik News : समृद्धी महामार्गावर अपघात सुरूच, कार संरक्षक भींतीला धडकली; 4 ठार, 4 गंभीर जखमी

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. पुन्हा एकदा एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.

  • -MIN READ Nashik,Nashik,Maharashtra
  • Last Updated :

नाशिक, 12 जून, लक्ष्मण घाटोळ : समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे. पुन्हा एकदा एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मध्यरात्री समृद्धी महामार्गावर इनोव्हा कारचा भीषण अपघात झाला. चालकाचं वाहानावरील नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला आहे.  या अपघातामध्ये चार जण  ठार तर चार जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शिर्डीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नातेवाईकांना हज यात्रेसाठी मुंबईल सोडून परत येत असताना ही अपघाताची घटना घडली आहे. चार जणांचा मृत्यू  घटनेबाबत अधिक माहिती अशी की, आपल्या नातेवाईकांना हज यात्रेसाठी मुंबईला सोडून परतत असताना सिन्नर परिसरात हा अपघात घडला. चालकाच कारवरील नियंत्रण सुटल्यानं कार महामार्गाच्या मध्यभागी असलेल्या संरक्षण भींतीला जावून आदळली. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे.  रज्जाक अहमद शेख, (55), सत्तार शेख लाल शेख, (65), सुलताना सत्तार शेख, (50) यांचा जागीच मृत्यू झाला. तर फैयाज दगुभाई शेख (40) यांचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. तर जुबेर रज्जाक शेख, (35), मैरूनिसा रज्जाक शेख (45), अझर बालन शेख, (25),  मुस्कान अजर शेख (22), हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी शिर्डीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. Pune News : पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, वऱ्हाडाचा टेम्पो पलटी, 13 जण गंभीर जखमी रविवारीही अपघात  दरम्यान रविवारी देखील असाच एक अपघात समृद्धी महामार्गावर घडला होता. हज यात्रेसाठी मुंबईहून संभाजीनगरच्या दिशेनं जात असताना समृद्धी महामार्गावरील वैजापूरजवळ हा कारचा अपघात झाला. या घटनेत अख्तर रझा हा एक वर्षाचा चिमुकला जागीच ठार झाला तर अन्य 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त खान कुटुंब हे मुळ बिहार राज्यातील छप्रा येथील रहिवासी असून, ते  सध्या वाशी, मुंबई येथे स्थायिक झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: accident
  • First Published :
जाहिरात
जाहिरात