वर्धा, 04 ऑगस्ट : प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीदवाक्य घेऊन धावणारी एसटी प्रवाशांबरोबर शेतकरी, व्यापारी, कारखानदार यांचा मालास घरातील सामान शिफ्टींगसाठी देखी धावत आहे. एसटी महामंडळाने महाकार्गो मालवाहतूक गाड्या (Mahakargo buses) तयार केल्या आहेत. लॉकडाउनच्या (lockdown) काळात समोर आलेली ही संकल्पना आता देखील सुरू असून या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मालवाहतुकीची विस्कटलेली घडी सावरण्याबरोबर तोट्यात चालणाऱ्या एसटीचे उत्पन्न वाढावे. यासाठी प्रवासी वाहतुकीची कालमर्यादा संपलेल्या बसचे मालवाहतूक बसमध्ये रूपांतर करण्यात आलेले आहे. लॉकडाउनच्या काळात एसटी बस सेवा बंद होती. या काळात एसटीला उत्पन्न मिळावे. त्यातून कर्मचाऱ्यांचा पगार व्हावा. या उद्देश्याने एसटीच्या बसमधून कार्गो वाहतूक सुरू करण्यात आली. हेही वाचा- लहानपणी वाचा गेली पण जिद्द नाही; ग्रामीण भागातील मुक्या कलावंताची ‘बोलकी’ चित्रं वर्धा एसटीची सेवा सुरक्षित सेवा म्हणून गणल्या जाते. प्रवासी वाहतूक सेवेसह राज्य परिवहन महामंडळ मागील दोन वर्षापासून मालवाहतुकीची सेवा देत असल्याने व्यावसायिक व्यापाऱ्यांचा सेवा घेण्याचा कल याकडे वाढला आहे. कोरोनाकाळात सर्व मालवाहतूक बंद असताना एसटीने मोठ्या प्रमाणात साथ दिली. त्यामुळे व्यापाऱ्यांनी तग धरला. आता इतर सामानासोबतच घरातील सामान शिफ्ट करण्यासाठी मालवाहतूक बस भाड्याने मिळत असल्याने दिलासा मिळाला आहे. घर शिफ्टिंगसाठी मालवाहतूक बस अनेकांच्या बदल्या होतात आणि सामान नेण्यासाठी खासगी वाहतूकदार मोठ्या प्रमाणात भाडे आकारतात. बदली झाल्यावर त्यांना घरातील सामान नेणे अत्यावश्यक असते. घर शिफ्टिंगसाठी किंवा बाहेर गावी शंभर, दोनशे व त्यापेक्षा पुढील किलोमीटर अंतरावर घर शिफ्टिंगसाठी ही मालवाहतूक बस मिळू शकते. हेही वाचा- खंडोबाचा थाट! Audi Q2 गाडीच्या किंमतीचे बनवले सिंहासन, Special Report कमी खर्चात मालवाहतूक एक ते शंभर किलोमीटरसाठी पाच हजार रुपयांत बस वाहतूक मिळते. तर 101 ते 200 किलोमीटर अंतरासाठी 57 रुपये प्रति किलोमीटर वाहतूक एसटीचा दर आहे. 200 किलोमीटर पुढील अंतरासाठी 55 रुपये प्रति किलोमीटर वाहतुकीचा दर असून यासाठी कंपन्या, व्यावसायिकांकडून प्रतिसाद मिळत आहे. बुकींगसाठी संपर्क अमर जोशी - 7972253619 , 9922751524 यांच्याशी संपर्क साधता येईल. वर्धा जिल्ह्यात पाच आगारांत 19 मालवाहतुकीच्या गाड्या तयार आहेत. एसटी महामंडळाच्या मालवाहतूक सेवेला समाधानकारक प्रतिसाद मिळत असल्याने महामंडळाच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात भर पडत असल्याचे वाहतूक कक्षाचे अमर जोशी यांनी सांगितले. मालवाहतुकीसाठी कोणत्या आगारात किती बस आर्वी- 4, तळेगाव- 2,पुलगाव, 2, हिंगणघाट- 5, वर्धा- 6
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.