मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Osmanabad : खंडोबाचा थाट! Audi Q2 गाडीच्या किंमतीचे बनवले सिंहासन, Special Report

Osmanabad : खंडोबाचा थाट! Audi Q2 गाडीच्या किंमतीचे बनवले सिंहासन, Special Report

खंडोबा मंदिर

खंडोबा मंदिर

अणदूर आणि मैलारपूर या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत. खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूर येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते. मंदिरे दोन पण मूर्ती एक अशी शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे.

उस्मानाबाद, 30 जुलै : महाराष्ट्रात अनेक देवी देवतांचे मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचा महिमा आणि इतिहास वेगवेगळा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील नळदुर्ग आणि अणदूरमध्ये असलेल्या खंडोबा (Historical Old Khandoba Temple) देवाचा महिमा देखील अगाध आहे. मंदिरातील श्रीचे सिंहासन हे चांदीने (silver) मढवण्यात आले आहे. त्यासाठी एकूण 61 किलो चांदीचा वापर केला गेला आहे. अवघ्या  21 दिवसात हे काम कारागीर परेश कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी पूर्ण केलं आहे.

अणदूरच्या खंडोबाचे वैशिष्ट्ये

श्री खंडोबा व बाणाई विवाहस्थळ याच ठिकणी झाल्याची आख्यायिका आहे. या ठिकाणी महाराष्ट्रासह, परिसरातून कर्नाटक,आंध्रप्रदेश येथून लाखोंच्या गर्दीने भाविक येतात. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर व छत्रपती शाहू महाराज यांनी या मंदिराचा सभामंडप बांधण्याचा उल्लेख आढळतो. या ठिकाणी विशेष म्हणजे भक्तांनी केलेला नवस हा पशू बळी देऊन नाही तर भंडारा उधळून पूर्ण केला जातो. 

मंदिरातील पूर्वीचे सिंहासन हे पितळी होते. त्याची झीज झाली होती. त्यामुळे ते बदलून लातूर येथील कारागीरांच्या माध्यमातून सागवानी सिंहासन तयार करण्यात आले. नंतर याला पुढे नाशिक येथील कारागीर परेश कुलकर्णी यांच्या माध्यमातून चांदी मढवण्यात आली आहे. हे सिंहासन बनविण्यासाठी साधारणत: 61 किलो 99% शुद्ध चांदीचा उपयोग झाला असून अंदाजे 38 लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

हेही वाचा- रेल्वे स्थानकांवर सुरू झाली 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट स्कीम', पाहा काय होणार तुमचा फायदा, VIDEO

मंदिराचा इतिहास

नळ राजाने नळदुर्ग मध्ये रणमंडल नावाचा किल्ला बांधला. याच नळदुर्ग किल्ल्यात खंडोबाचे पहिले मंदिर आहे. इब्राहिम आदिलशाहने हे मंदिर पाडून येथे उपली बुरुज बांधला, त्यानंतर नळदुर्गपासून दोन किलोमीटर अंतरावर बोरी नदीच्या काठी मंदिर बांधण्यात आले, छत्रपती शाहू महाराज यांनी मंदिराच्या देखभालीसाठी 500 एकर जमीन दान केली होती. अणदूरचे मंदिर तीन टप्प्यात झाले आहे.

पुढे नळदुर्ग आणि अणदूरमध्ये देवाच्या मूर्तीसाठी वाद सुरू झाला. त्यानंतर अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि नळदुर्गमध्ये पावणे दोन महिने देवाची मूर्ती ठेवण्याचा करार झाला. तो करार आजही पाळला जातो. अणदूर येथील ठिकाणी देवाचे वास्तव्य हे 10 महिने व ऊर्वरित 2 महिने हे कर्नाटकातील खानापूर येथे असते.

अणदूर आणि नळदुर्ग या दोन्ही मंदिराचे पुजारी एकच असून, ट्रस्ट सुध्दा एकच आहे. सदानंद आणि होनकळस मोकाशे हे खंडोबाचे मूळ पुजारी, त्यांचे वंशज सध्या पुजारी आहेत. अणदूरमध्ये दररोज एक पुजारी त्यांच्या हिस्साप्रमाणे बदलतात. नळदुर्गमध्ये मात्र पावणेदोन महिने चार पुजारी एकच असतात, मात्र देव अणदूरला गेल्यानंतर तेथेही हिस्साप्रमाणे रोज पुजारी बदलतात.

हेही वाचा- बसस्थानकाला खड्डे, कचरा अन् दुर्गंधीचा विळखा; प्रवाशांचे आरोग्य धोक्यात, पाहा VIDEO

जेव्हा देवाची मूर्ती अणदूरला असते तेंव्हा नळदुर्गच्या मंदिरात फक्त शिवलिंग दिसते, श्री खंडोबा महादेवाचा अवतार असल्याने मूर्तीच्या खाली शिवलिंग दिसते. श्री खंडोबाची मूर्तीही एक शिवलिंग असून, त्यावर हळदीचा लेप लावून नाक, डोळे बसविले जातात. त्यावर चांदीचा किरीट चढवला जातो. सकाळ आणि रात्री दोन वेळा सोहळ्यात पूजा केली जाते. रात्री शेजारती म्हटली जाते. दोन्ही पूजेच्या वेळी नगारा वाजवला जातो. तो मान मुस्लिम भक्त याकूब शेख यांच्याकडे आहे.

दोन मंदिरे, मूर्ती एक

या खंडोबाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, अणदूर आणि मैलारपूर या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे आहेत. यातील अंतर 4 किलोमीटरचे आहे. खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने आणि मैलारपूर येथे पावणे दोन महिने वास्तव्य असते. मंदिरे दोन पण मूर्ती एक अशी शेकडो वर्षांपासूनची परंपरा आहे. तसेच अणदूरहून नळदुर्गला आणि नळदुर्गहून अणदूरला देवाची मूर्ती नेताना दोन्ही गावातील मानकऱ्यांमध्ये लेखी करार केला जात असल्याची माहिती श्री खंडोबा मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी दिली. 

मंदिर पत्ता आणि वेळ

उस्मानाबाद - सोलापूर या महामार्गावर उस्मानाबाद पासून 55 किमी व सोलापूर पासून 40  किमी अंतरावर अनदूर आणि नळदुर्ग या दोन गावा दरम्यान हे प्राचिन मंदिर आहे. पहाटे 6 वाजता दररोज खंडोबाची आरती केली जाते. दिवसभर मंदिर दर्शनासाठी खूले असते. रात्री  8 वाजता आरती करून प्रसाद वाटला जोतो त्यानंतर मंदिर बंद केले जाते.

Historical Old Khandoba Temple

गुगल मॅपवरून साभार

२१ दिवसांत आम्ही काम पूर्ण केले

जेंव्हा सगळ्यासोबत मिटींग झाली तेंव्हा त्यात अस ठरलं की, देवाला सिंहासन हे चांदीचे बनवायचे. नंतर आम्ही सिंहासन बनवायचे काम हाती घेतले. हे काम करत असताना मंदीराचे पुजारी तसेच गावातील तरूण मंडळींनी आम्हाला सहकार्य केले. त्यांच्या सहकार्यामुळेच आम्ही अवघ्या 21 दिवसात हे काम करू शकलो. हे सिंहासन बनविण्यासाठी साधारणत: 61 किलो 99% शुद्ध चांदीचा उपयोग झाला आहे. खंडोबा हे महादेवाचा अवतार असल्यामुळे सिंहासनाच्या डिझाइनमध्ये महादेवाची पिंड रेखाटण्यात आली आहे अशी माहिती कारागीर परेश कुलकर्णी यांनी दिली.

First published:

Tags: Famous temples, Maharashtra News, Osmanabad, Temple