उस्मानाबाद, 01 ऑगस्ट : लातूरच्या चित्रकला महाविद्यालयात चित्रकलेचे धडे गिरवणाऱ्या रवी बारसकरच्या (Ravi Barskar) चित्रांनी अनेकांना वेड लावले आहे. शारीरिक व्यंगत्वावर मात करून कलाविश्वातला रवीचा हा चित्रमय अनेकांसाठी प्रेरणादायी तर आहेच, शिवाय तो थक्क करणाराही आहे. एका मुक्या कलावंताची बोलकी चित्रे कलारसिकांना कशी वेड लावतात, याचे उत्तम उदाहरण म्हणून रवी बारसकरच्या कुंचल्याकडे पाहता येईल. उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा येथील रवीला बालपणापासूनच चित्रकलेचे वेड होते. लहानपणी रवी सर्दी, तापामुळे आजारी पडला. त्यातून त्याला ऐकू येईना. यामुळे तो बहिरा झाला. त्यातच त्याची वाचाही गेली. ऐकू येईना आणि बोलता येईना. यामुळे खाना खुणा करूनच तो आपल्याला काय म्हणायचे आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करू लागला. अगदी लहान वयात घरात त्याला काही पाहिजे असेल तर तो चित्रे सांगायचा. चित्र हे त्याचे संवादाचे साधन बनले. यात तो दिवसेंदिवस पारंगत होत गेला. संवादाचे माध्यम म्हणून तो चित्र काढू लागला. आणि त्यातच चौथीत त्याच्या चित्राला प्रथम पुरस्कार मिळाला. हेही वाचा-
खंडोबाचा थाट! Audi Q2 गाडीच्या किंमतीचे बनवले सिंहासन, Special Report
हा पुरस्कारच त्याच्यासाठी लाखमोलाचा ठरला. या पुरस्काराने त्याला कलेच्या दुनियेत आणले. त्याच्यातला आत्मविश्वास अधिक बळावत गेला. दहावीपर्यंत तो गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकला. पुढे कलाविश्वात करियर करण्यासाठी रवी बारसकर याने लातूरच्या चित्रकला महाविद्यालय गाठले. फौंडेशन, ए. टी.डी. आणि जी. डी. आर्ट पेटिंगपर्यंतचे कलाशिक्षण घेतले. याच काळात त्याच्यातील कला अधिक बहरत गेली. महाविद्यालयीन जीवनात बारसकरच्या चित्रांना अनेक पुरस्कार मिळाले. त्याच्यातल्या चित्रकाराला अनेक पुरस्काराने गुणवत्तापूर्ण सिद्ध केले. प्रत्येकात एक कलावंत दडलेला असतो. तो बाहेर काढण्याची जबाबदारी ही प्रत्येकाची असते. आपल्यातल्या अभिजात कलेला सिद्ध करण्यासाठी ‘रियाज’ मात्र तेवढा करावाच लागतो. आज रवी बारसकरच्या चित्रांना कलारसिकांतून मोठी मागणी आहे. मुक्या कलावंताची बोलकी चित्रे किती गुणवत्तापूर्ण चित्रांनी आज सिद्ध केले आहे. कुंचल्याची जादू रवी बारसकर जी. डी. आर्टमध्ये राज्यात पहिला आला. कलाविश्वात त्याने लातूर पॅटर्नच निर्माण केला. आता त्याच्या कुंचल्याची जादू सर्वदूर पसरत आहे.
हेही वाचा-
मुलांवर लक्ष आहे ना? ग्रामीण भागातील विद्यार्थीही Child Pornography च्या जाळ्यात, VIDEO
रवी राज्यात आला होता पहिला लातूरच्या चित्रकला महाविद्यालयात जी. डी. आर्ट पेंटिंगचा निकाल हाती आला आणि तो राज्यात प्रथम आल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी जाहीर केले. लातूरच्या रवी बारसकरने राज्याच्या कलाविश्वात या निकालातून लातूर पॅटर्न निर्माण केला. या महाविद्यालयाने दिलेल्या चित्रकारांच्या कुंचल्याने जगभरातील कलारसिकांना आज वेड लावले आहे. त्याच कलेच्या पंढरीचा रवीही वारकरी आहे. चौथीत असताना पुरस्कार चित्रांच्या माध्यमातूनच तो आपल्या भावना व्यक्त करू लागला. रंग-रेषांमध्ये गुंतत गेला, रंगत रमत गेला. पुढे चित्र हेच त्याच्या संवादाचे माध्यम बनले. त्याने चौथीत असताना काढलेल्या चित्राला प्रथम पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार महत्त्वाचा टप्पा ठरला व यातून त्याचा आत्मविश्वास द्विगुणित झाला.
रांगोळी, वॉल पेंटिंग तसेच वेगवेगळ्या प्रकारची चित्रे लातूरच्या चित्रकला महाविद्यालयात शिक्षण घेत असताना रवी जी. डी. आर्टच्या पेंटिंगच्या परीक्षेमध्ये राज्यात पहिला आला होता. तो सध्या रांगोळी, वॉल पेंटिंग तसेच वेगवेगळ्या प्रकारची चित्रे काढतो. त्याची चित्रे आतापर्यंत बंगळुरू, औरंगाबाद, पुणे, सातारा, लातूर येथील प्रदर्शनामध्ये प्रदर्शित झाली आहेत. त्याच्या चित्रांना 31 पुरस्कार मिळाले असल्याचे रवीने सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.