जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Wardha: आर्वी गर्भपात प्रकरणात खळबळजनक माहिती उघड, डॉक्टर नीरज कदमलाही बेड्या

Wardha: आर्वी गर्भपात प्रकरणात खळबळजनक माहिती उघड, डॉक्टर नीरज कदमलाही बेड्या

Wardha: आर्वी गर्भपात प्रकरणात खळबळजनक माहिती उघड, डॉक्टर नीरज कदमलाही बेड्या

वर्ध्यातील आर्वी गर्भपात प्रकरणी डॉक्टर नीरज कदम याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात आता आणखी नवे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 16 जानेवारी : वर्ध्यातील आर्वी येथे अवैध गर्भपात (illegal abortion case) प्रकरणात दररोज नवनवीन माहिती उघड होत आहे. आर्वीतील घटनेने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणात अखेर डॉक्टर नीरज कदमला पोलिसांनी अटक (Dr. Neeraj Kadam arrest by Police) केली आहे. त्याच्या चौकशीत आता आणखी नवी माहिती उघड होण्याची दाट शक्यता आहे. त्याच दरम्यान या प्रकरणात आता आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. (Shocking information reveals in Arvi Kadam hospital abortion case) खळबळजनक माहिती उघड आर्वी येथील कदम रुग्णालयात रेखा कदम या गर्भपात करत होत्या. मात्र, गर्भपात केंद्राची परवनगी ही डॉ. रेखा कदम यांच्या नावावरच नसल्याचं समोर आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या केंद्राची परवानगी रेखा कदम यांच्या सासू डॉ. शैलजा कदम यांच्या नाववर आहे. नियमानुसार, जिल्हा आरोग्य समिती आणि केंद्राकडून ज्यांना परवानगी दिली असते त्यांनाच गर्भपात करण्याची परवानगी असते. पण सासूच्या नावावर असलेल्या परवान्याचा वापर करुन डॉ. रेखा कदम करत असल्याचं उघड झालं आहे. वाचा :  आर्वीतील त्या रुग्णालयाच्या परिसरात खोदकाम सुरूच, आणखी एक कवटी आढळल्याने खळबळ आतापर्यंत सहा आरोपींना अटक प्रकार उघडीस आल्यानंतर मुलीच्या आई व वडिलांसह गर्भपात करणाऱ्या डॉ. रेखा कदम आणि 2 परिचारिका अशा एकूण 5 जणांना पोलिसांनी अटक केलं होतं. आता याच प्रकरणात मध्यरात्री डॉ. नीरज कदम यांना पोलिसांनी अटक केली आहे. डॉक्टर नीरज कदम याला अटक करण्यात आल्याने आता या प्रकरणात अटक झालेल्या एकूण आरोपींची संख्या सहावर पोहोचली आहे. डॉ. कदमकडून काळविटाची कातडी जप्त वर्धा जिल्ह्याच्या आर्वी येथील डॉ. कदम याच्या घराच्या आणि हॉस्पिटलची पोलिसांकडून तपासणी सुरू आहे. तपासणीदरम्यान काळविटाची कातडी जप्त करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या सूचनेनंतर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी कातडी जप्त केली आहे. काळविटाची कातडी आढळल्याने एकच खळबळ निर्माण झाली आहे. वनविभागाच्या टीमने पंचनामा करत कातडी जप्त केली आहे. प्रथमदर्शनी ही कातडी मादी काळविटाची असल्याचं वनविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितलं. जप्त केलेली कातडी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर ही कातडी कशाची आणि किती जुनी आहे, ही बाब स्पष्ट होईल, असं वनविभागाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केलंय. वाचा :  वर्ध्यातील रुग्णालयामागील गॅस चेंबरमध्ये सापडल्या 11 कवट्या गर्भपाताचे इंजेक्शन, रजिस्टर जप्त गर्भपात प्रकरणात नवे-नवे खुलासे सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. डॉक्टर कदम याच्या घरी पोलिसांनी झडती घेतली आणि यावेळी तेथून शासकीय गर्भपात करण्याच्या कामात येणारे इंजेक्शन घरी आढळल्याची माहिती समोर आली आहे. इतकेच नाही तर तपासात 25 ते 30 रजिस्टर जप्त केल्याची माहितीही उघड झाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: crime , wardha
  • First Published :
जाहिरात
जाहिरात