मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /भयंकर! वर्ध्यातील रुग्णालयामागील गॅस चेंबरमध्ये सापडल्या 11 कवट्या आणि 53 हाडं, गर्भपात प्रकरणाला वेगळे वळण

भयंकर! वर्ध्यातील रुग्णालयामागील गॅस चेंबरमध्ये सापडल्या 11 कवट्या आणि 53 हाडं, गर्भपात प्रकरणाला वेगळे वळण

आर्वी: गोबरगॅस चेंबरमध्ये भ्रूण आणि हाडांचे काही अवशेष सापडले

आर्वी: गोबरगॅस चेंबरमध्ये भ्रूण आणि हाडांचे काही अवशेष सापडले

वर्धा जिल्ह्यातील आर्वी याठिकाणी अल्पवयीन मुलीच्या झालेल्या गर्भपाताच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला होता. आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

नरेंद्र मते, प्रतिनिधी

आर्वी, 13 जानेवारी: वर्धा जिल्ह्यातील आर्वी याठिकाणी अल्पवयीन मुलीच्या झालेल्या गर्भपाताच्या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला होता. आता या प्रकरणाने वेगळे वळण घेतले असून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करून डॉ. रेखा कदम हिला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पथकाने तपासणी केली असता समोर आलेले दृश्य भयावह होते.

पोलिसांनी रुग्णालयाच्या मागील बाजूस तपासणी केली असता गोबरगॅस चेंबरमध्ये भ्रूण आणि हाडांचे काही अवशेष सापडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणामुळे खळबळ माजली आहे. पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, डॉ रेखा कदम यांच्या रुग्णालयाच्या मागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत नवजात भ्रूणाचे 11 कवटी सदृश्य अवयव आणि 53 हाडे सापडली आहेत. यावरुन हे प्रकरण एकाच घटनेपर्यंत मर्यादित नसल्याचा अंदाज बांधला जात आहे.

हे वाचा-निर्भयाची पुनरावृत्ती; मूकबधीर मुलीवर गँगरेप; भयंकर अवस्थेत रस्त्यावर फेकलं

काय आहे हे प्रकरण?

पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला जेव्हा एका अल्पवयीन मुलीचा अधिकचे पैसे आकारून गर्भपात केल्याची तक्रार दोन दिवसांपूर्वी आर्वी पोलिसात देण्यात आली होती. या प्रकरणात आई वडिलांंसह महिला डॉ. रेखा कदम यांना अटक करण्यात आली. त्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यांची पोलिस कोठडी मिळाल्यानंतर पोलिसांकडून रुग्णालयात तपासणी करण्यात आली. त्यावेळी रुग्णालयाच्या मागील परिसरात खोदकाम करण्यात आले. गोबरगॅसच्या खड्ड्यात खोदकाम करण्यात आले असता, 11 कवट्या, 53 हाडे आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

5 जानेवारी रोजी एका 13 वर्षीय मुलीचा डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयात गर्भपात करण्यात आला होता. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडूनही घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्योत्स्ना गिरी करीत आहेत. खोदकाम केल्यानंतर जे काही अवशेष सापडले आहेत ते डॉ. हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत ते जप्त करण्यात आले आहेत, शिवाय रजिस्टरही जप्त करण्यात आले आहे. आर्वीमध्ये कोणत्या कायद्यांचे उल्लंघन झाले आहे याचा तपास सुरू आहे.

हे वाचा-Online गेमसाठी 5 वीतील विद्यार्थ्याची आत्महत्या, आधी आईसमोरच केला सराव

परवाना होणार रद्द

जिल्ह्याच्या आठही तालुक्याच्या ठिकाणी गर्भपात समितीचे गठणच झालं नसल्याचं समोर आलं आहे. या समितीत एकूण पाच लोक असतात. या समितीमार्फत गर्भपात केंद्रावर लक्ष ठेवले जाते. जिल्ह्यात 34 खासगी, 11 शासकीय गर्भपात केंद्र आहेत. गेल्या तीन महिन्यात 12 आठवड्यापर्यंतचे 526 तर 20 आठवडे झालेले 36 गर्भपात करण्यात आले. गर्भपात केल्यानंतर वेस्टेज जमिनीत पुरण्याचा नियम नाही. याच नियमाला धरून आता रुग्णालयातील गर्भपात केंद्राची परवानगी रद्द केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विधी सल्लागार अॅड. कांचन बडवाने यांनी दिली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Crime news