Home /News /maharashtra /

Wardha: आर्वीतील त्या रुग्णालयाच्या परिसरात खोदकाम सुरूच, आणखी एक कवटी आढळल्याने खळबळ

Wardha: आर्वीतील त्या रुग्णालयाच्या परिसरात खोदकाम सुरूच, आणखी एक कवटी आढळल्याने खळबळ

वर्ध्यातील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात दररोज नवनवी माहिती उघड होत आहे. आता या रुग्णालयाच्या परिसरात आणखी एक कवटी सदृश्य अवशेष आढळून आला आहे. (One more skull recovered from hospital premises)

    नरेंद्र मते, प्रतिनिधी वर्धा, 15 जानेवारी : वर्ध्यातील आर्वी येथील अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात दररोज नवनवीन आणि खळबळजनक माहिती (shocking information reveals) समोर येत आहे. आर्वीतील (Arvi Taluka Wardha) कदम रुग्णालयाच्या परिसरात 11 मानवी कवट्या आणि 54 अवशेष जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. (One more skull recovered from arvi private hospital premises in wardha) शुक्रवारी रुग्णालयाच्या परिसरात पोलीस, फॉरेन्सिक टीमच्या सहाय्याने शोधकार्य सुरू होते. त्यावेळी शोधकार्यात पुन्हा एक कवटी सारखा अवयव आढळला असल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यंत या परिसरातून 12 कवट्या आणि 54 हाडे आढळली आहेत. बुधवारी पोलिसांनी रुग्णालयाच्या मागील बाजूस असलेल्या गॅस चेंबरची तपासणी केळी होती. त्यात पोलिसांना 11 कवट्या 54 हाडे, वापरलेले ग्लोज, सीरींज, प्लास्टिक पिशव्या ईत्यादी तसेच पिशवी मध्ये अर्भकांचे अवशेष आढळून आले होती. रुग्णालयाच्या परिसरात सुरू असलेल्या खोदकाम आणि शोधकार्याच्या दरम्यान तेथे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी येत होती. यावेळी एक कवटी सदृश्य अवशेष आढळून आला आहे. पोलिसांकडून या परिसरात आजही पुन्हा तपासणी, शोधकार्य करण्यात येणार आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण? 5 जानेवारी रोजी एका 13 वर्षीय मुलीचा डॉ. रेखा कदम यांच्या रुग्णालयात गर्भपात करण्यात आला होता. अधिकचे पैसे आकारून एका अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याची तक्रार आर्वी पोलिसात देण्यात आली होती. अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात गुन्हा दाखल करून डॉ. रेखा कदम हिला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या पथकाने तपासणी केली असता समोर आलेले दृश्य भयावह होते. पोलिसांनी रुग्णालयाच्या मागील बाजूस तपासणी केली असता गोबरगॅस चेंबरमध्ये भ्रूण आणि हाडांचे काही अवशेष सापडले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अशी माहिती दिली आहे की, डॉ रेखा कदम यांच्या रुग्णालयाच्या मागे असलेल्या गोबर गॅसच्या टाकीत नवजात भ्रूणाचे 11 कवटी सदृश्य अवयव आणि हाडे सापडली आहेत. यावरुन हे प्रकरण एकाच घटनेपर्यंत मर्यादित नसल्याचा अंदाज बांधला जात आहे. वाचा : चिमुकल्याला घेऊन घराबाहेर पडली अन् घडलं विपरीत; नाल्यात आढळले मायलेकाचे मृतदेह परवाना होणार रद्द जिल्ह्याच्या आठही तालुक्याच्या ठिकाणी गर्भपात समितीचे गठणच झालं नसल्याचं समोर आलं आहे. या समितीत एकूण पाच लोक असतात. या समितीमार्फत गर्भपात केंद्रावर लक्ष ठेवले जाते. जिल्ह्यात 34 खासगी, 11 शासकीय गर्भपात केंद्र आहेत. गेल्या तीन महिन्यात 12 आठवड्यापर्यंतचे 526 तर 20 आठवडे झालेले 36 गर्भपात करण्यात आले. गर्भपात केल्यानंतर वेस्टेज जमिनीत पुरण्याचा नियम नाही. याच नियमाला धरून आता रुग्णालयातील गर्भपात केंद्राचा परवाना रद्द केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या विधी सल्लागार अॅड. कांचन बडवाने यांनी दिली आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Crime, Wardha

    पुढील बातम्या