सातारा, 23 एप्रिल: दिवाण हाऊसिंग फायनान्स लि.चे (DHFL)प्रमोटर्स आणि YES BANK घोटाळ्याचे आरोप असलेले कपील आणि धीरज वाधवान बंधूंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. वाधवान बंधू आणि त्यांच्यासोबत आलेल्या 21 जणांनी पाचगणीहून महाबळेश्वरला मोठ्या पोलिस बंदोबस्तात हलवण्यात आलं आहे. 14 दिवसांचा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचा कालावधी संपल्याने त्यांनी आता महाबळेश्वर येथील बंगल्यावर होम क्वारंटाईन करण्यात येणार आल्याची माहिती मिळाली आहे.
दुसरीकडे, वाधवान बंधूंना अंमलबजावणी संचनासय (ईडी) आणि सीबीआयने ताब्यात घ्यावे, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
हेही वाचा... हॉटस्पॉट झाले कमी पण धोका कायम; राज्याचं लक्ष आता या 5 धोकादायक केंद्रांकडे
गृहमंत्र्यांनी सांगितले की, वाधवान बंधूंचा 14 दिवसांचा इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनचा कालावधी बुधवारी दुपारी 2 वाजता समाप्त झाला. त्यांना ताब्यात घेतण्यात यावे, असं सीबीआय आणि ईडीला सांगितलं आहे. वाधवान बंधूंना सीबीआय किंवा ईडी ताब्यात घेत नाही तोपर्यंत ते राज्य सरकारच्या ताब्यात राहतील. कोणालाही लंडनला जाण्याची परवानगी दिली जाणार नाही. सीबीआयने वाधवान बंधूंचा ताबा मागितल्यास त्यांच्या हवाले करण्यात येईल.
खंडाळ्याहून गेले महाबळेश्वरला...
दरम्यान, कपील आणि धीरज वाधवान बंधू यांनी लॉकडाऊनची उल्लंघन केल्याचं उघड झालं आहे. 144 कलमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे. हे वाधवान बंधू आपल्या 5 अलिशान कारमधून 23 कुटुंबीयांना घेऊन मुंबईहून महाबळेश्वरला लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी सुरू असतानाही गेले होते. या प्रवासासाठी त्यांनी थेट गृहमंत्रालयातून पत्र मिळालं होतं. या पत्राने वाद निर्माण झाला असून ही परवानगी कुणी दिली याची चौकशी करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं. तर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावरून सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
हेही वाचा.. तबलिगी जमातच्या सदस्यांनी कोरोनाला हरवलं, आता असा वाचवणार दुसऱ्या रुग्णांचा जीव
गृहमंत्रालयाचे प्रधान सचिव अमिताभ गृप्ता यांच्या लेटरहेडवर वाहतुकीच्या परवानगीचं पत्र आहे. 8 एप्रिल अशी त्यावर तारीखही आहे. ही मंडळी माझ्या ओळखीची असून कौटुंबिक मित्र आहेत. तातडीच्या कौटुंबिक कामासाठी त्यांना खंड्याहून महाबळेश्वरला जात आहेत. त्यांना तिथे पोहोचता यावं यासाठी सहकार्य करावं असं त्या पत्रात म्हटलं आहे. या पत्रावरून सोमय्या यांनी सरकारला लक्ष्य केलं आहे.
राज्यात संचार बंदी सुरू असतानाच येस बॅक प्रकरणात बेलवर असणारे वाधवा बंधू कुटुंबीयांसमवेत 23 लोकांना VIP पास दिला गेला. मुंबईतून खंडाळा, महाबळेश्वर प्रवास यासाठी कार पास पत्र गृह विभाग सचिव विशेष अमिताभ गुप्ता यांनी दिला असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला. बेलवर असणार वाधवान याना कसा प्रवास पास मिळतो यसंदर्भात चौकशी करावी अशी मागणी किरीट सोमय्या यांनी राज्यपाल यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात ज्यांनी पत्र दिले त्या अमिताभ गुप्ता यांच्या प्रतिक्रियेसाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण त्यांचा प्रतिसाद दिला नाही. या संदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांनी प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
संपादन- संदीप पारोळेकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.