मुंबई, 14 ऑगस्ट : विरारमध्ये एक भयानक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एकाच कुटुंबातील पाच लहान मुलांना अन्नातून विषबाधा (Virar Food Poisoning) झाल्याची घटना समोर आली आहे. यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. तर तिघांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही घटना शनिवारी घडली आहे. पाच जणांपैकी पोलिसांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.
शवविच्छेदन अहवालानंतर दोन लहान मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल, अशी माहिती मांडवी पोलिसांनी दिली आहे. एकाच कुटुंबातील पाच मुलांसह आई वडिलांना विषबाधा झाली आहे. पाचही मुलं रात्री जेवून झोपले. त्यानंतर सकाळी पाचही चिमुरड्यांना उलट्या आणि जुलाब होऊ लागले. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाच जणांपैकी दोन चिमुरड्यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत रुग्णालय प्रशासनाकडून नेमकं मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यात आलं नाही.
हे ही वाचा : लग्नासाठी पुण्याहून बीडला निघाले; पण मृत्यूनं रस्त्यात गाठलं, 6 जणांचा मृत्यू
विरार पूर्व टोकरे ग्रामपंचायत टोकरे पाडा येथे घडली आहे. विरार पूर्व येथील टोकरे ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या भोयपाडा येथे अश्फाक खान आणि रजियाबानू खान हे आपल्या पाच मुलांसह राहतात. शुक्रवारी राञी साडेनउच्या सुमारास हे सर्व कुटुंब जेवल्यानंतर झोपले. माञ शनिवारी पहाटेच्या सुमारास अचानक मुलांची तब्येत बिघडली. यातील नऊ वर्षाचा मुलगा आसिफ खान आणि आठ वर्षाची मुलगी फरीफ खान यांना पहाटे चारच्या सुमारास उलटी आणि पोटात दुखू लागल्याने विरारच्या भाताणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले होते.
त्यानंतर दहा वर्षांची मुलगी फराना खान, चार वर्षाचा मुलगा आरीफ खान आणि तीन वर्षाचा मुलगा साहिल खान यांना तुळींजच्या पालिका रुग्णालयात दाखल केले. माञ यातील आसिफ आणि फरीफ या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सध्या मांडवी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा : Vinayak Mete : गाडीचा चुराडा, चाक सुद्धा तुटले, मेटेंच्या अपघाताचा Ground Zero हून पहिला VIDEO
संबंधित घटनेची माहिती मिळताच बहुजन विकास आघाडीचे आमदार राजेश पाटील यांनी मांडवी पोलीस आणि प्रा आ केंद्र भाताणेचे वैदयकीय अधिकारी डॉ सुषमा मुळीक आणि कृष्णकुमार यादव यांना माहिती दिली. त्यानंतर उर्वरीत तीन मुलांना वसई विरार महानगरपालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ठीक असली तरी त्यांना देखरेखीखाली ठेवले आहे. मुलांच्या आई-वडिलांना कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. ते व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे. ही विषबाधा नेमकी कशाने झाली हे समजू शकले नसून सर्प दंश किवा जेवणातून विषबाधा झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.