गणेश दुडम, प्रतिनिधी पनवेल, 14 ऑगस्ट : शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर (mumbai pune expressway) भीषण अपघात झाला आहे. या अपघातात विनायक मेटे (vinayak mete) जखमी झाले आहे. त्यांना तातडीने पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती समोर आली आहे. घटनास्थळाचा व्हिडीओ आता समोर आला आहे. विनायक मेटे हे आपल्या कार्यकर्त्यांसह रात्री बीडहून मुंबईला रवाना झाले होते. मुंबईला जात असताना विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर अपघात झाला आहे. या अपघातात मेटे हे जखमी झाले आहे. हा अपघात इतका भीषण होता की, फोर्ड इंडेव्हर गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे.
विनायक मेटे यांच्या गाडीला मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात, प्रकृती स्थिर, पनवेलमधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू pic.twitter.com/OT8wuHvvwX
— News18Lokmat (@News18lokmat) August 14, 2022
नेमका हा अपघात कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. या अपघातात मेटे जखमी झाले आहे. त्यांना तातडीने पनवेलमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या तब्येत ठीक असल्याची माहिती त्यांच्या सचिवाने दिली आहे. अधिक माहितीनुसार, खोपली इथल्या बातम बोगद्याजवळ हा अपघात घडला. आज पहाटे साडेपाच वाजता हा अपघात झाला आहे. अपघातामध्ये विनायक मेटे यांना दुखापत झाली आहे. त्यांच्यावर सध्या पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात क्रिटीकेयर युनिटमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.अपघाताचं नेमकं कारण स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र गाडीत काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती समोर येत आहे.वाहनात तांत्रिक बिघाड झाल्याने गाडी डोगंराच्या कपारीला धडकल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.