मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

लग्नासाठी पुण्याहून बीडला निघाले; पण मृत्यूनं रस्त्यात गाठलं, 6 जणांचा मृत्यू

लग्नासाठी पुण्याहून बीडला निघाले; पण मृत्यूनं रस्त्यात गाठलं, 6 जणांचा मृत्यू

पुणे येथून आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी  केज तालुक्यातील जीवाचीवाडी इथे जात असताना गाडीचा अपघात झाला. या अपघातात सहाजण जागीच ठार झाले आहेत (6 Died in Major Road Accident)

बीड 14 ऑगस्ट : बीडच्या पाटोदा - मांजरसूंबा रोडवरील पाटोद्याजवळ बामदळे वस्ती इथे स्विफ्ट डिझायर कार आणि आयशर टेम्पोचा भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल सहा जण जागीच ठार झाले आहेत. घटनास्थळी पाटोदा पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते तात्काळ दाखल झाले. यानंतर गाडीमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढलं. भीषण अपघतात विनायक मेटेंच्या गाडीचा अक्षरशः चुराडा; थरकाप उडवणारे घटनास्थळावरील Photos पुणे येथून आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी केज तालुक्यातील जीवाचीवाडी इथे जात असताना गाडीचा अपघात झाला. पाटोदा शहराजवळील बामदळे वस्ती येथे सकाळी सातच्यादरम्यान झालेल्या या अपघातात सहा लोक ठार झाले आहेत. अपघात एवढा भीषण होता की स्विफ्ट कार आयशर टेम्पोच्या खाली घुसली. अखेर ही स्विफ्ट कार काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. 'मी मदत मागत होतो पण कोणी आलं नाही'; ड्रायव्हरने सांगितला त्या एका तासातला धक्कादायक थरार अपघातानंतर आतमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्यात आलं तेव्हा गाडीमधील लोकांच्या शरीराचा अक्षरशः चंदामेंदा झालेला होता. घटनास्थळी पाटोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस हजर झाले होते. सर्वांनी मिळून मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली. दरम्यान दुसऱ्या एका घटनेत अपघातात आज विनायक मेटे यांचंही निधन झालं आहे. शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे एक्सप्रेसवर अपघात झाला. यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान विनायक मेटे यांचं निधन झालं
First published:

Tags: Accident, Major accident

पुढील बातम्या