मालेगाव ब्लास्ट प्रकरण: साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर गैरहजर, सर्व आरोपींना दिले 'हे' निर्देश

मालेगाव ब्लास्ट प्रकरण: साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर गैरहजर, सर्व आरोपींना दिले 'हे' निर्देश

पहिल्याच दिवशी सातपैकी केवळ तीन आरोपी कोर्टासमोर हजर झाले.

  • Share this:

मुंबई, 3 डिसेंबर: सन 2008 मध्ये मालेगावात (Malegaon  Blast) झालेल्या शक्तीशाली बॉम्बस्फोट (Bomb )प्रकरण खटल्याची नियमित सुनावणी गुरूवार, 3 डिसेंबरपासून सुरु झाली आहे. मात्र पहिल्याच दिवशी सातपैकी केवळ तीन आरोपी कोर्टासमोर हजर झाले. त्यामुळे कोर्टाची कार्यवाही पुढे सरकली नाही.

या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यादेखील गैरहजर होत्या.त्यावर कोर्टानं येत्या 19 डिसेंबरला सातही आरोपींना कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.

हेही वाचा...भाजपच्या जोरदार संघटनात्मक हालचाली सुरु, सरकारबाबत प्रभारींनी मांडलं भाकीत

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टात गुरूवारी सुनावणी पार पडली. या सुनावणीला आरोपी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरेहीत, अजय राहिरकर आणि समीर कुलकर्णी हे तिघे कोर्टासमोर हजर झाले. मात्र, या खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावतीनं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्या तातडीने हजर होऊ शकणार नाहीत, असं कोर्टाला वकिलांतर्फे  कळवण्यात आलं. अनलॉक नंतर राज्यभरातील सर्व कनिष्ट कोर्टांचं नियमित कामकाज आता सुरु झालेलं आहे. त्यामुळे या प्रलंबित खटल्यातील सुनावणींचा वेग वाढवण्याचा निर्णय विशेष एनआयए कोर्टानं घेतला आहे.

दरम्यान, डिसेंबर 2020 पर्यंत हा खटला निकाली काढला जाईल, असं आश्वासन गेल्यावर्षी एनआयएनं मुंबई हायकोर्टात  दिलं होतं. मात्र लॉकडाऊनपूर्वीच्या सहा महिन्यांत या खटल्यातील केवळ 14 जणांचीच साक्ष नोंदवण्यात आली आहे. या खटल्यात एकूण 475 साक्षीदार आहेत. ज्यातील 300 हून अधिक साक्षीदारांची साक्ष अद्याप बाकी आहे.

काय घडलं होतं 29 सप्टेंबर 2008 रोजी?

मालेगाव येथे 29 सप्टेंबर 2008 रोजी एका मशिदीत बॉम्बस्फोट झाले होते. यात 7 जणांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, सुधाकर चतुर्वेदी, सुधाकर द्विवेदी, अजय राहिरकर आणि संदीप डांगे यांना अटक झाली होती. एनआयए विशेष कोर्टात सुनावणी सुरु आहे.

या खटल्याला जाणून बुजून विलंब...

या खटल्याची सुनावणी जलदगतीनं घेण्याचे निर्देश हायकोर्टानं याआधीच एनआयए कोर्टाला दिले आहेत. मात्र,  खटल्याच्या सुनावणीला काही वकील हजरच राहत नाहीत. या खटल्याला जाणून बुजून विलंब केला जात आहे, असा आरोप या बॉम्बस्फोट प्रकरणातील संशयित आरोपी समीर कुलकर्णी यानं केला आहे. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला एनआयए कोर्टानं लवकरात लवकर निकाली काढावा, अशी मागणी करत सध्या जामिनावर असलेले आरोपी समीर कुलकर्णी यांनी हायकोर्टात केला होती.

Published by: Sandip Parolekar
First published: December 3, 2020, 3:03 PM IST

ताज्या बातम्या