नागपूर, 10 ऑक्टोबर: ओबीसीच्या (OBC) कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण देवू असं सांगणारे आज मात्र वेगळंच बोलत आहेत. विजय वडेट्टीवार दुहेरी भूमिका घेत असल्याचा गौप्यस्फोट खासदार संभाजीराजे यांनी केला होता. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. मात्र, संभाजीराजेच्या गौप्यस्फोटावर विजय वडेट्टीवर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा...माझं भाषण चुकीच्या पद्धतीनं दाखवलं गेलं; संभाजीराजेंचा खुलासा
मराठा समाजाला ओबीसीमध्ये का समाविष्ठ करत नाही, असं मी खासगीमध्ये सुद्धा बोललो नाही. 27 टक्के कोटा ओबीसीसाठी आहे. त्या व्यतिरिक्त तुम्ही घ्या, असं मी संभाजीराजे यांना खासगीमध्ये बोललो होतो. मात्र, राजेंचा गैरसमज झाला. त्यातून ते बोलले. मात्र, जे बोलले ते अर्धवट बोलते, याचा खेद वाटतो असंही विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं. ओबीसीसाठी जी लढाई मी लढत आहेत, त्याची धार बोथट करण्याची ही खेळी असावी, अशी शंकाही वडट्टेवार यांनी यावेळी बोलून दाखवली.
विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं की, ओबीसी समाजात जन्मलेला आणि ओबीसीसाठी लढणारा मी कार्यकर्ता आहे. ओबीसी समाजाचं वाईट होऊ देणार नाही. ओबीसी समाजासाठी मी लढेन, मला मंत्रिपद महत्त्वाचं नाही. समाज खितपत पडला आहे, त्याला न्याय मिळावा, ही अपेक्षा आहे. ती लढाई मी लढणार आहे. त्यासाठी मंत्रिपद गेलं तरी मी मागेपुढे पाहाणार नाही.
ओबीसीमध्ये मराठा समाजाला समाविष्ठ करू नये, अशीच माझी सुरूवातीपासूनची भूमिका आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मात्र आमचं नुकसान होऊ नये, असं माझं म्हणणं आहे. मात्र, ओबीसींच्या मनात गैरसमज निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का? हे सुद्धा समजायला पर्याय नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितलं. संभाजीराजे यांनी केंद्र सरकारकडे विषय न्यावा, त्याचं काम लवकर होईल, असा सल्ला देखील वडेट्टीवार यांनी दिला.
हेही वाचा...एखाद्या समाजासाठी तलवार काढण्याची भाषा अयोग्य, वड्डेटीवारांचा संभाजीराजेंना टोलाकाय म्हणले होते संभाजीराजे...?
विजय वडेट्टीवारांच्या भूमिकेने मी फार व्यथित झालो आहे. वडेट्टीवार मला एक बोलले आणि आता दुसरं बोलतायत, माझी त्यांना हात जोडून विनंती आहे, त्यांनी असं करू नये, त्यांनी माझं संपूर्ण भाषण ऐकावं, असेही खासदार संभाजीराजे म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी वडेट्टीवारांबाबत एक गौप्यस्फोट देखील केला.
विजय वडेट्टीवार मला म्हणाले की, ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण देवू आज मात्र ते वेगळंच बोलतायत. त्यामुळे वडेट्टीवार दुहेरी भूमिका घेत असल्याचा गौप्यस्फोट खासदार संभाजीराजेंनी यावेळी केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.