Home /News /maharashtra /

'आत्मनिर्भर' नवरा नको गं बाई! या तरुणाला तब्बल 500 मुलींचा लग्नासाठी नकार

'आत्मनिर्भर' नवरा नको गं बाई! या तरुणाला तब्बल 500 मुलींचा लग्नासाठी नकार

लग्नसंस्थेमध्ये जर मुलगा पायावर उभा नसेल तर अडचण येते. इथं नागपूरच्या होतकरू तरुणाला मात्र वेगळीच समस्या सतावते आहे.

    नागपूर, 06 मार्च : 'स्टॅन्ड अप इंडिया स्टार्टअप इंडिया' असं म्हणत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी तरुणांना कायमच व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन देत आले आहेत. लॉकडाऊनच्या काळातही त्यांनी आत्मनिर्भर होण्याचा संदेश दिला. मात्र धडाडीनं व्यवसायात उडी घेतलेल्या तरुणासमोर एक वेगळंच नकोसं वास्तव उभं राहिलं आहे. (Nagpur news) हा तरुण आहे नागपूरचा. उच्चशिक्षण घेतलं, नोकरीही मिळवली. मात्र मनासारखा पगार मिळाला नाही. त्यानंतर काहीएक मनाशी निश्चय करत त्यानं व्यवसायात उडी घेतली. व्यवसायात यशही मिळालं, प्रगती झाली. मात्र आता नवीच अडचण त्याला सतावते आहे. (girls reject businessman for marriage) रितेश झुनके असं या नागपूरच्या उच्चशिक्षित तरुणाचं नाव आहे. रितेश व्यवसाय करतो म्हणून त्याला तब्बल 500 हून अधिक तरुणींनी आजवर लग्नासाठी नकार दिला आहे.  (girls reject transport businessman) रितेश याबाबत सांगतो, 'मी दोन-तीन मॅट्रिमोनियल साईट्सवर नाव नोंदवलेलं आहे. इतकंच काय, वधू-वर मेळाव्यांनाही उपस्थिती लावली. तिथल्या पुस्तिका आणल्या. घरच्यांनी मुलींच्या पालकांना फोन लावल्यावर सांगितलं जातं, की बायोडाटा पाठवा. तो पाठवल्यावर पुढून काहीच प्रतिसाद मिळत नाही. मग माझे पालक पुन्हा फोन करतात त्यावेळी तिकडून सांगितलं जातं, की आम्हाला तुमचा व्यवसाय आवडलेला नाही.' (Ritesh zunke rejected for marriage due to transport business) (हे वाचा गर्लफ्रेंडसाठी त्यानं उभारलंय लव्ह आयलँड; कुणाला हवाय असा बॉयफ्रेंड?) रितेशचं वय आहे 34 वर्ष. त्यानं मास कम्युनिकेशनमध्ये उच्चशिक्षण घेतलेलं आहे. काही काळ पत्रकारिताही केली. मात्र पगार नीट मनासारखा न मिळाल्यानं त्यानं हे क्षेत्र सोडत हिमतीनं स्वतःचा व्यवसाय उभारला. हा व्यवसाय आहे ट्रान्सपोर्टेशनचा. व्यवसाय उभारल्यानंतर काही काळातच त्यानं जम बसवला. 2016 मध्ये त्यानं व्यवसाय सुरू केला. बिझनेस चांगलाच वाढला. मात्र लग्न काही होत नाही. (girls rejected Ritesh transport businessman) (हे वाचा 57 वर्षीय हॉलिवूड अभिनेत्याने 31 वर्षे लहान तरुणीसोबत बांधली पाचवी लग्नगाठ) बहुतांश तरुणी आणि त्यांचे पालक व्यवसाय करणाऱ्या तरूणांकडे पूर्वग्रहदूषित नजरेनं पाहत असल्याचं दिसतं. त्यातही 'ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात असणाऱ्या तरुणांना वाईट सवयी असतात.' या पालकांच्या चुकीच्या धारणेचा बळी रितेशला व्हावं लागतं आहे. 500 हून जास्त तरुणींचा नकार रितेशनं पचवला आहे. रितेशचं सगळं कुटुंब त्याच्या पाठीशी आहे. ते त्याच्यासाठी स्थळ शोधत असतात. (हे वाचा-बाँब बनवताना स्फोट की कार्यकर्त्यांवर हल्ला? भाजपमधील 6 जण जखमी) रितेशच्या वहिनी  ज्योत्स्ना झुनके आणि रेश्मा झुनके म्हणतात, 'मुलगा स्वभावानं चांगला आणि प्रगल्भ असेल काय हरकत आहे? प्रेमविवाह करताना अनेकदा मुली बेरोजगार मुलांवरही प्रेम करतात. इथं तर मुलानं स्वतःच्या बळावर व्यवसाय उभा केला आहे. तो यशस्वी आहे. त्याला वाईट सवयी नाहीत. अशावेळी विवाहाला नकार देण्याची मुलींची भूमिका चुकीची नाही का?' रितेश आणि त्याच्या कुटुंबीयांचा हा प्रश्न खरोखर निरूत्तर करणारा आणि चुकीच्या सामाजिक धारणांना उघड करणारा आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Marriage, PM narendra modi, Small business, Young boy

    पुढील बातम्या