मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /गर्लफ्रेंडसाठी त्यानं उभारलंय लव्ह आयलँड; कुणाला हवाय असा बॉयफ्रेंड?

गर्लफ्रेंडसाठी त्यानं उभारलंय लव्ह आयलँड; कुणाला हवाय असा बॉयफ्रेंड?

आजही तो या लव्ह आयलँडवर (love island) आपल्या गर्लफ्रेंडची वाट पाहत आहे.

आजही तो या लव्ह आयलँडवर (love island) आपल्या गर्लफ्रेंडची वाट पाहत आहे.

आजही तो या लव्ह आयलँडवर (love island) आपल्या गर्लफ्रेंडची वाट पाहत आहे.

    बीजिंग, 06 मार्च : प्रेमाखातर (love) व्यक्ती काय करेल, हे कोणालाही सांगता येत नाही. तुझ्यासाठी चंद्र, तारे आणेन असं बोलणारे प्रत्यक्षात तर ते करू शकत नाही पण काहीतरी हटके करण्याचा नक्कीच प्रयत्न करतात. चीनमधील (China) 30 वर्षांच्या एका व्यक्तीनंही प्रेमापोटी लव्ह आयलँड (love island) उभारलं आणि आजही तिथंच तो आपल्या गर्लफ्रेंडची वाट पाहत आहे.

    चीनमधील ज्यू नावाची ही व्यक्ती. त्याने आपल्या गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी चक्क लव्ह आयलँड तयार केलं आहे. त्यानं आपल्या गार्डनचे रुपांतर प्रेमाच्या बेटात केलं आहे. यासाठी त्याने तब्बल  11 हजार पाऊंड म्हणजेच 11 लाख रुपये खर्च केले आहेत.

    ज्यू आणि त्याच्या गर्लफ्रेंडचं ब्रेकअप झालं तेव्हा ज्यूने आपल्या वृद्ध आई-वडीलांची सेवा करण्यासाठी गावी परतण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांच्या गर्लफ्रेंडने शहरातच थांबण्याचा निर्णय घेतला. ब्रेकअपनंतरही ज्यू यांनी आपल्या गर्लफ्रेंडची अनेकदा समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात त्याला यश आलं नाही. ज्यूचा हा लव्ह प्रोजेक्ट पूर्ण होण्यास एक वर्षांचा कालावधी लागला. यावर्षीच हा प्रकल्प पूर्णत्वास गेला.

    हे वाचा - आपल्याच प्रेमात आकंठ बुडाली; बॉयफ्रेंडशी ब्रेकअप करून स्वतःशीच केलं लग्न

    हे आयलँड गुलाबी रंगांच्या वनस्पतींनी आच्छादित करण्यात आलं. या आयलँडमधील गवतदेखील गुलाबी असून, चेरीची अनेक झाडं येथे लावण्यात आली. तसंच आयलँडमधील एका रोमॅंटिक स्पॉटवर (Romantic Spot) जाण्यासाठी एक पूलदेखील बांधण्यात आला आहे. ज्यूची एक्स गर्लफ्रेंड या आयलँडमुळे खूपच प्रभावित झाली पण तिनं ज्यूसोबत पुन्हा रिलेशनशिपमध्ये येण्यास नकार दिला. माझ्यापेक्षा अधिक चांगली गर्लफ्रेंड तुला मिळेल, असा विश्वास तिनं व्यक्त केला.

    "मी खूप रोमॅंटिक माणूस आहे. पण मला माझ्या भावना शब्दांत मांडता येत नाहीत. त्यामुळेच त्यांनी आपल्या कृतीतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत", असं ज्यू म्हणाला.

    हे वाचा - डोले-शोले बनवण्यासाठी केला विचित्र प्रयोग; बॉडीबिल्डरची आता झाली भयंकर अवस्था

    आज तकच्या वृत्तानुसार, ज्यूची एक्स गर्लफ्रेंड (Ex-Girlfriend) अद्याप तरी या प्रेमाच्या बेटावर आली नाही. तो तिथंच तिची वाट पाहतो आहे. पण त्याची ही मेहनत वाया गेली नाही. कारण हे लव्ह आयलँड कपल्समध्ये कमालीचं लोकप्रिय होत आहे. ज्यूच्या लव्ह गार्डनमध्ये भलेही त्यांची एक्स गर्लफ्रेंड आलेली नाही पण अन्य कपल्स (Couples) मात्र या गार्डनकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होताना दिसत आहेत. हा स्पॉट आता लोकप्रिय मॅरेज प्रपोजल स्पॉट बनला असून, लोक येथे येऊन वेडींग फोटोशूटही (Wedding PhotoShoot) करत आहेत.

    First published:

    Tags: Boyfriend, China, Girlfriend, International, Lifestyle, Love, Love island, Love story