Home /News /maharashtra /

धक्कादायक! एका क्षणात झाला दोन भावांचा मृत्यू, जनावरांना पाणी आणण्यासाठी गेले पण...

धक्कादायक! एका क्षणात झाला दोन भावांचा मृत्यू, जनावरांना पाणी आणण्यासाठी गेले पण...

जनावरांना पाणी पाजन्याकरीता तलावात उतरतांना पाण्याचा अंदाज चुकल्यानं दोघेही भावंड बुडाल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे.

    प्रविण तंडेकर, प्रतिनिधी भंडारा, 11 मे : राज्यात कोरोना महामारीमुळे हाहाकार पसरला आहे. हा संसर्गजन्य रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा अवलंबण्यात आला असताना नागरिकांना घराच्या बाहेर न जाण्याच्या वारंवार सुचना देण्यात आल्या आहे. पण असं असतानादेखील भंडारा तालुक्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुमसर तालुक्यातील पवणारखारी गावातील दोन भावंडांचा तलावात बुडून मृत्यू झाला. दोन्ही भाऊ पोहोण्यासाठी तलावात केला आहे. सदर घटना सोमवारच्या सकाळी 10.15 वाजे दरम्यान घडली असून विशाल ग्यानिराम शेन्डे(14) व खुशाल ग्यानिराम शेन्डे(16)अशी उपचारादरम्यान मृत पावलेल्या भावांची नावं आहेत. जनावरांना पाणी पाजन्याकरीता तलावात उतरतांना पाण्याचा अंदाज चुकल्यानं दोघेही भावंड बुडाल्याची प्राथमिक माहीती समोर आली आहे. मात्र, घटना घडताच घटनास्थळावरील उपस्थितांनी बचावाकरीता तलावात उडी घेतली. त्यात प्राथमिक आरोग्य केंद्र गोबरवाही इथे नेईपर्यंत दोघेही भाऊ अंशतः जिवंत असल्याची माहीती आहे. मात्र, आपातकालीन वैद्यकिय सुविधांच्या अभावामुळे तुमसरच्या प्रवासादरम्यान त्यांचा वाटेत मृत्यु झाला. कोरोना महामारीत शेतकऱ्यांसमोर नवीन रोगाचं संकट, बळीराजा हवालदील सदर घटनेनं अनेक गंभीर प्रश्नांना तोंड वर करण्यास भाग पाडलं आहे. एकाच परिवारातील दोन्ही भावंड मृत पावल्यानं संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. गोबरवाही क्षेत्रातील पवनारखाडी हे गाव जंगलव्याप्त हिरवळीसह गणेश उत्सवाकरीता प्रसिद्ध आहे. त्यात गावाबाहेरील भगरु तलावात एकाच परिवारातील दोन सख्या भावांचा बुडून मृत्यु झाल्यानं गाव पुन्हा चर्चेच आलं आहे. Lockdown मध्ये कुठल्या ट्रेन महाराष्ट्रातून जाणार? इथे आहे संपूर्ण यादी घटनेच्या दिवशी नेहमीप्रमाणे दोघेही भाऊ विशाल व खुशाल घरची जनावरं घेवून चरण्याकरीता निघाले होते. जनावरांना पाणी पाजन्याकरीता ते गावापासून किमान 1 किमी अंतरावरील तलावात उतरले. तलाव जुना व पाणी खोल असल्याचा नेमका अंदाज त्या भावंडांचा चुकला. खोल पाण्यात दोघेही जाताच वाचवा वाचवा असा आरडाओरड झाला. घटनास्थळावर उपस्थितीतांनी त्यांना वाचविन्याकरीता प्रयत्न केले. दरम्यान सदर घटनेची माहीती परिवारासह गोबरवाही पोलिसांना देण्यात आली. अथक प्रयत्नानंतर दोघाही भावंडांना तालावातून बाहेर काढण्यात आले. प्रत्यक्षदर्शींच्या मते त्या दोघांमध्ये अंशतः प्राण असल्याची माहीती दैनिक पुण्य नगरीशी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते शरद खोब्रागडे यांनी दिली. मुलासमोरच आई-वडिलांनी सोडला जीव, मृत्यूनंतर 3 दिवसांनी उघडकीस आली घटना क्षणाचाही विलंब न करता विशाल व खुशालला गोबरवाही प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. गोबरवाही इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात मुबलक आपातकालिन सुविधा उपलब्ध नसल्याने त्या दोघांना तुमसर येथे उपचारार्थ हलविण्यात आलं. रुग्नवाहिकेतून उपजिल्हा शासकिय रुग्णालय तुमसर इथे पोहोचतानांच वाटेतच विशाल व खुशालने आपला अखेरचा श्वास सोडला. इथे गोबरवाही पोलिसांनी घटनेची नोंद करून कारवाई पार पाडली. मात्र सदर घटनेमुळे तालुक्याच्या ग्रामीण भागातील वैद्यकिय सुविधांचे खुळखुळे चित्र सर्वांसमक्ष आणले आहे. मृतक भावंडांच्या परिवारात आई व वडीलच आहेत. त्यात परिसरात घटनेमुळे सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. वेळीच योग्य उपचार मिळाले असते तर दोघांचाही जिव वाचला असता अशी चर्चा गावात होत आहे. संपादन - रेणुका धायबर
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    पुढील बातम्या