कोरोना महामारीत शेतकऱ्यांसमोर नवीन रोगाचं संकट, बळीराजा हवालदील

कोरोना महामारीत शेतकऱ्यांसमोर नवीन रोगाचं संकट, बळीराजा हवालदील

अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर, बारामती तालुक्यातील हजारो एकरावरील शेती संकटात सापडली आहे.

  • Share this:

अहमदनगर, 11 मे : अगोरदच कोरोनाच्या संकटाचा सामना करत शेतकरी आपली शेती जगवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, आता त्यातच टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांवर अनामिक संकट उभं ठाकलं आहे. फेब्रुवारी महिन्यात लावलेल्या टोमॅटोवर तिरंगा नावाच्या रोगानं हल्ला केला आहे. एकरी दिड ते दोन लाख रूपये खर्च करून शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यात टोमॅटोची लागवड केली.

मे आणि जुन महिन्यात टोमॅटोचा हंगाम सुरू होण्याच्या तोंडावरच टोमॅटोवर तिरंगा नावाच्या रोगावर प्रादूर्भाव झाला आहे. या रोगामुळे टोमॅटो खराब होत असून आता करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे पडला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, अकोले आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर, बारामती तालुक्यातील हजारो एकरावरील शेती संकटात सापडली आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी आणि बोगस बियाणं कंपन्यावर कारवाई करावी अशी मागणी किसान सभेचे अजित नवले यांनी केली आहे.

लाखो रूपये खर्च करून जगवलेली शेती डोळ्यांदेखत उध्वस्त होताना शेतकऱ्यांना बघावी लागत आहे. संगमनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीचं पंचनामे सुरू केले असल्याचं कृषी अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. आधीच कोरोनामुळे लोकांसमोर उपासमारीची वेळ आली आहे. त्यात शेतकऱ्यांसमोर आलेल्या या नव्या संकटाने त्यांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे.

अन्नदाता शेतकरी आपल्याला जगवण्यासाठी झटतो आहे. मात्र, आज हवालदिल झालेल्या या अन्नदात्यालाही सरकारनं आधार देण्याची गरज आहे. या रोगावार मात करण्यासाठी सरकारने पाऊलं उचलायला हवीत.

संपादन - रेणुका धायबर

First published: May 11, 2020, 5:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading