उद्यापासून सुरू होणाऱ्या कुठल्या ट्रेन महाराष्ट्रातून जाणार? इथे आहे संपूर्ण यादी

उद्यापासून सुरू होणाऱ्या कुठल्या ट्रेन महाराष्ट्रातून जाणार? इथे आहे संपूर्ण यादी

मंगळवारपासून 15 मार्गांवर दोन्ही बाजूकडून सेवा सुरू होतील. त्यात महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रमुख दोन ट्रेन आहेत. कुठल्या ट्रेन सुरू होणार, कुठे थांबणार, बुकिंग कसं करायचं याची संपूर्ण माहिती.

  • Share this:

मुंबई, 11 मे : देशव्यापी लॉकडाऊन (Lockdown) संपायला अजून सहा दिवस असले, तरी रेल्वेने (Indian Railway) काल महत्त्वपूर्ण घोषणा करत काही मार्गांवरच्या प्रवासी गाड्या सुरू करत असल्याचं सांगितलं. मंगळवारपासून या 15 मार्गांवर दोन्ही बाजूकडून सेवा सुरू होतील. त्यात महाराष्ट्रातून जाणाऱ्या प्रमुख दोन ट्रेन आहेत. irctc.co.in या indian railway च्या website वर त्यासाठी बुकिंग करावं लागेल.

51 दिवसांच्या ब्रेकनंतर रेल्वेने सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळ्या ट्रेनचं तिकीट फक्त ऑनलाईनच काढता येणार आहे. रेल्वे स्टेशनवर कुठल्याही ट्रेनचं तिकीट मिळणार नाही. RAC, Waiting अशी कुठलीही यादी या ट्रेनला नसेल. फक्त कन्फर्म तिकीट मिळालं असेल त्यांनाच प्रवासाची अनुमती देण्यात येईल.

Coronavirus चा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर मार्चमध्ये रेल्वेसेवा बंद करण्यात आळी होती. आता 12 मेपासून 15 मार्गांवरची सेवा सुरू होत आहे. प्रामुख्याने सुरुवातीला दिल्लीकडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या सेवा सुरू करण्याचा निर्णयाला आहे.

संंबंधित - बुकिंग सुरू होताच बंद झाली IRCTCची वेबसाईट, रेल्वेने दिलं हे कारण

त्यातल्या महाराष्ट्रातून या दोन मार्गांवरून गाड्या धावतील. मुंबई सेंट्रल ते दिल्ली ही ट्रेन 12 मेपासून रोज धावेल. शिवाय नवी दिल्ली ते मडगाव ही ट्रेन महाराष्ट्रात रत्नागिरी, आणि पनवेल स्टेशनला थांबेल. शुक्रवार आणि शनिवारीच ही ट्रेन धावेल.

मंगळवारपासून सुरू होणाऱ्या ट्रेन मार्गांची संपूर्ण यादी

1. हावडा ते नवी दिल्ली

वारंवारता: दररोज

थांबे: आसनसोल जं, धनबाद जं, गया जं, पं. कानपुर मध्यवर्ती विभाग, उपाध्याय जं., प्रयागराज जं

प्रारंभ तारीख: 12 मे

2. नवी दिल्ली ते हावडा

वारंवारता: दररोज

थांबे: आसनसोल जं, धनबाद जं, गया जं, पं. कानपुर मध्यवर्ती विभाग, उपाध्याय जं., प्रयागराज जं

प्रारंभ तारीख: 13 मे

3. राजेंद्र नगर ते नवी दिल्ली

वारंवारता: दररोज

थांबे: पटना जंक्शन, पं. कानपुर मध्यवर्ती विभाग, उपाध्याय जं., प्रयागराज जं

प्रारंभ तारीख: 12 मे

4. नवी दिल्ली ते राजेंद्र नगर

वारंवारता: दररोज

थांबे: पटना जंक्शन, पं. कानपुर मध्यवर्ती विभाग, उपाध्याय जं., प्रयागराज जं

प्रारंभ तारीख: 13 मे

5.  दिब्रुगड ते नवी दिल्ली

वारंवारता: दररोज

थांबे: दिमापूर, लुमडिंग जं, गुवाहाटी, कोकराझार, मारियानी, न्यू जलपाईगुडी, कटिहार जं,, बरौनी जं, दानापूर, पं. कानपुर मध्यवर्ती विभाग, उपाध्याय जं., प्रयागराज जं

प्रारंभ तारीख: 14 मे

6. नवी दिल्ली ते दिब्रूगड पर्यंत

वारंवारता: दररोज

थांबे: दिमापूर, लुमडिंग जं, गुवाहाटी, कोकराझार, मारियानी, न्यू जलपाईगुडी, कटिहार जं, बरौनी जं, दानापूर, पं. कानपुर मध्यवर्ती विभाग, उपाध्याय जं., प्रयागराज जं

प्रारंभ तारीख: 12 मे

7. नवी दिल्ली ते जम्मू तवी

वारंवारता: दररोज

थांबे: लुधियाना

प्रारंभ तारीख: 13 मे

8. जम्मू तवी ते नवी दिल्ली

वारंवारता: दररोज

थांबे: लुधियाना

प्रारंभ तारीख: 14 मे

9. बेंगलुरू ते नवी दिल्ली

वारंवारता: दररोज

स्टॉपपेजेस: अनंतपूर, गुंताकल जंक्शन, सिकंदराबाद जंक्शन, नागपूर, भोपाळ जंक्शन, झांसी जंक्शन

प्रारंभ तारीख: 12 मे

10. नवी दिल्ली ते बेंगलुरू

वारंवारता: दररोज

स्टॉपपेजेस: अनंतपूर, गुंताकल जंक्शन, सिकंदराबाद जंक्शन, नागपूर, भोपाळ जंक्शन, झांसी जंक्शन

प्रारंभ तारीख: 12 मे

11. तिरुवनंतपुरम ते नवी दिल्ली

वारंवारता: मंगळवार, गुरुवार, शुक्रवार

थांबे: एर्नाकुलम जंक्शन, कोझीकोड, मंगलोर, मडगाव, पनवेल, वडोदरा, कोटा

प्रारंभ तारीख: 15 मे

12. नवी दिल्ली ते तिरुवनंतपुरम

वारंवारता: मंगळवार, बुधवार, रविवार

थांबे: एर्नाकुलम जंक्शन, कोझीकोड, मंगलोर, मडगाव, पनवेल, वडोदरा, कोटा

प्रारंभ तारीख: 13 मे

13. चेन्नई मध्यवर्ती ते नवी दिल्ली

वारंवारता: शुक्रवार, रविवार

थांबे: विजयवाडा, वारंगल, नागपूर, भोपाळ, झांसी, आग्रा

प्रारंभ तारीख: 15 मे

14. नवी दिल्ली ते चेन्नई मध्यवर्ती

वारंवारता: बुधवार, शुक्रवार

थांबे: विजयवाडा, वारंगल, नागपूर, भोपाळ, झांसी, आग्रा

प्रारंभ तारीख: 13 मे

15. बिलासपूर ते नवी दिल्ली

वारंवारता: सोमवार, गुरुवार

थांबे: रायपूर जं, नागपूर, भोपाळ, झांसी

प्रारंभ तारीख: 14 मे

16. नवी दिल्ली ते बिलासपूर

वारंवारता: गुरुवार, शनिवार

थांबे: रायपूर जं, नागपूर, भोपाळ, झांसी

प्रारंभ तारीख: 12 मे

17. रांची ते नवी दिल्ली

वारंवारता: गुरुवार, रविवार

थांबे: पं. कानपुर मध्यवर्ती विभाग, उपाध्याय जं

प्रारंभ तारीख: 14 मे

18. नवी दिल्ली ते रांची

वारंवारता: बुधवार, शनिवार

थांबे: पं. कानपुर मध्यवर्ती विभाग, उपाध्याय जं

प्रारंभ तारीख: 13 मे

19. मुंबई सेंट्रल ते नवी दिल्ली

वारंवारता: दररोज

थांबे: सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा

प्रारंभ तारीख: 12 मे

20. नवी दिल्ली ते मुंबई सेंट्रल

वारंवारता: दररोज

थांबे: सूरत, वडोदरा, रतलाम, कोटा

प्रारंभ तारीख: 13 मे

21. अहमदाबाद ते नवी दिल्ली

वारंवारता: दररोज

थांबे: पालनपूर, अबू रोड, जयपूर, गुडगाव

प्रारंभ तारीख: 12 मे

22. नवी दिल्ली ते अहमदाबाद

वारंवारता: दररोज

थांबे: पालनपूर, अबू रोड, जयपूर, गुडगाव

प्रारंभ तारीख: 13 मे

23. अगरतला ते नवी दिल्ली

वारंवारता: सोमवार

थांबे: बदरपुर जंक्शन, गुवाहाटी, कोकराझार, न्यू जलपाईगुडी, कटिहार जंक्शन, बरौनी जंक्शन, पाटलीपुत्र, पं. कानपुर मध्यवर्ती विभाग, उपाध्याय जं

प्रारंभ तारीख: 18 मे

24. नवी दिल्ली ते अगरतला

वारंवारता: बुधवार

थांबे: बदरपुर जंक्शन, गुवाहाटी, कोकराझार, न्यू जलपाईगुडी, कटिहार जंक्शन, बरौनी जंक्शन, पाटलीपुत्र, पं. कानपुर मध्यवर्ती विभाग, उपाध्याय जं

प्रारंभ तारीख: 20 मे

25. भुवनेश्वर ते नवी दिल्ली

वारंवारता: दररोज

थांबे: बालासोर, हिजली (खडगपूर), टाटानगर, बोकारो स्टील सिटी, गया, पं. कानपूर मध्यवर्ती विभाग, उपाध्याय जं

प्रारंभ तारीख: 13 मे

26. नवी दिल्ली ते भुवनेश्वरपर्यंत

वारंवारता: दररोज

थांबे: बालासोर, हिजली (खडगपूर), टाटानगर, बोकारो स्टील सिटी, गया, पं. उपाध्याय

जे.एन., कानपूर मध्यवर्ती

प्रारंभ तारीख: 14 मे

27. नवी दिल्ली ते मडगाव

वारंवारता: शुक्रवार, शनिवार

थांबे: रत्नागिरी, पनवेल, सूरत, वडोदरा जंक्शन, कोटा जंक्शन

प्रारंभ तारीख: 15 मे

28. मडगाव ते नवी दिल्ली

वारंवारता: सोमवार, रविवार

थांबे: रत्नागिरी, पनवेल, सूरत, वडोदरा जंक्शन, कोटा जंक्शन

प्रारंभ तारीख: 17 मे

29. सिकंदराबाद ते नवी दिल्ली

वारंवारता: बुधवार

थांबे: नागपूर, भोपाळ, झाशी

प्रारंभ तारीख: 20 मे

30. नवी दिल्ली ते सिकंदराबाद

वारंवारता: रविवार

थांबे: नागपूर, भोपाळ, झाशी

प्रारंभ तारीख: 17 मे

First published: May 11, 2020, 6:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading