नागपूर, 19 सप्टेंबर : राज्यात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनाच्या संसर्गाचा राज्यात शिरकाव झाल्यापासून मुंबई, ठाणे, पुण्यात मोठ्या संख्येनं रुग्ण समोर येत होते. त्यावेळी तातडीने लॉकडाऊन लागू केल्यामुळे ग्रामीण भागात कोरोना कमी प्रमाणात पसरल्याचं आपण पाहिलं. पण आता राज्य अनलॉक होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातही कोरोनाचा धोका वाढल्याचं पाहायला मिळतं. अशात नागपूर हा कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाला आहे. त्यामुळे आजपासून दोन दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. आज आणि उद्या नागपुरात जनता कर्फ्यू राहणार आहे. त्यामुळे आपल्या जीवाची आणि आरोग्याची काळजी घेत नागरिकांनी विनाकारण बाहेर न पडण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. तसंच पुढच्या आठवड्यातही शनिवार आणि रविवार जनता कर्फ्यू असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या जनता कर्फ्यूला नागपूरकरांनी प्रतिसाद द्यावा असं आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केलं आहे. अमोल कोल्हेंनी कोव्हिड टेस्टसाठी भेट दिलं उपकरण, काही सेकंदात करणार 24 चाचण्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. तर यावर नागपूर महानगरपालिकाचा कोणताही अनधिकृत आदेश नाही. पण आपल्या शहरातील संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी स्वत: पुढे येत कर्फ्यूचं पालन करावं असं मनपा आयुक्तांनी म्हटलं आहे. त्यामुळे नागपूरकरांनो, कोरोनोच्या जीवघेण्या संसर्गाचा नाश करण्यासाठी जनता कर्फ्यूचं पालन करा आणि विनाकारण कोणीही घराच्या बाहेर पडू नका. पहिल्या सामन्याआधीच वादात अडकला धोनी, चाहते म्हणाले-‘काही तरी लाज ठेव’ दरम्यान, कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी गर्दी करू नका असं सरकार वारंवार सांगत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून लॉकडाऊन करण्यात आलं आहे. राज्यातल्या ग्रामीण भागात तुलनेने कमी लागण झाली आहे. परिस्थिती अशीच ठेवण्यासाठी लोकांनी गर्दी करू नये असा नियम असताना रेड झोनमध्ये असलेल्या अनेक जिल्ह्यात रोज गर्दी होत असल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे कोरोनाचा धोका आणखी वाढत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.