दुबई, 18 सप्टेंबर : आयपीएलच्या (IPL 2020) तेराव्या हंगामाला उद्यापासून सुरुवात होणार आहे. 19 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज (CSK) यांच्यात शेख जैयाद क्रिकेट मैदानावर हा सामना होणार आहे. मात्र या सामन्याआधीच चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Ms Dhoni) वादात अडकला आहे. सोशल मीडियावर सध्या धोनीवर टीका केली जात आहे, याचे कारण आहे एक जाहिरात. धोनीच्या एका जाहिरातीचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट झाला. यात धोनी चीनी मोबाइल कंपनी ओपोची (Oppo) जाहिरात करताना दिसत आहे. धोनीची ही जाहिरात आल्यानंतर चाहते नाराज झाले आहेत.
चिनी कंपनी ओपीओचा नवीन फोन ओपीओ रेनो 4 प्रोबाबत ही जाहिरात आहे. ओपोने धोनी एका वर्षानंतर मैदानात उतरणार आहे, याबाबत ही जाहिरात तयार केली आहे. ओपीओ धोनीवरील एक विशेष कार्यक्रम 24 सप्टेंबर रोजी रिलीज होऊ शकतो.
वाचा-गावस्कर यांनी निवडली पलटनची प्लेइंग इलेव्हन! 'या' मुंबईकर खेळाडूला जागा नाही
The man we’ve missed on the cricket field, the Captain Extraordinaire MS Dhoni is here to inspire us to fight all hindrances, get back on our feet and #BeTheInfinite with the new #OPPOReno4Pro. Get ready for the release of this emotional ride on 24th September! pic.twitter.com/TgQ97MpuoY
— OPPO India (@oppomobileindia) September 17, 2020
वाचा-कोरोनामुळे IPL मध्ये होणार मोठा बदल! असे असतील 8 नियम
ओपोने हा व्हिडीओ शेअर करताना, "गेल्या एका वर्षापासून ज्याची आपण आठवण काढत होतो. तोच कर्णधार एमएस धोनी पुन्हा एकदा सर्व अडथळ्यांना तोंड देण्यासाठी सज्ज आहे. आता तुम्हीही 24 सप्टेंबरला हा भावनिक प्रवास पाहण्यासाठी सज्ज व्हा"
वाचा-'हा' संघ आहे बुकींचा फेव्हरेट! वाचा कोणत्या संघावर आहे कितीचा सट्टा
चिनी कंपन्यांचा होत आहे निषेध
धोनीने ओपे या चिनी कंपनीसोबत जाहिरात केल्यानंतर चाहते भडकले आहे. त्यांनी कठोर शब्दात धोनीवर टीका केली आहे. भारत आणि चिनी सैन्य यांच्यात गॅलवॅनमध्ये संघर्ष सुरू झाला आहे, तेव्हापासून भारत सरकारने आणि देशातील लोकांनी चिनी कंपन्यांविरूद्ध मोर्चेबांधणी केली आहे. या दबावाखाली बीसीसीआयला त्यांचे आयपीएल प्रायोजक असलेल्या विवोचेसोबतही करार रद्द केला होता.