जुन्नर, 18 सप्टेंबर : शिरूरचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे व जगदंबा प्रतिष्ठान महाराष्ट्र यांच्या माध्यमातून डॉक्टर कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून अनावश्यक खर्च टाळून नारायणगाव येथील ग्रामीण रुग्णालय कोव्हिड केअर सेंटरला "हाय फ्लो नोझल ऑक्सिजन" हे उपकरण भेट देण्यात आलं आहे.
हे उपकरण रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून ऑक्सिजनचे प्रमाण कमी असणाऱ्या रुग्णांसाठी याचा अधिक फायदा होणार आहे. या उपकरणाचं वैशिष्ट्य म्हणजे एकाच वेळी रुग्णांची 24 मोफत तपासणी करण्यात येणार आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधिकारी डॉक्टर योगेश आगम, डॉक्टर मिलिंद घोरपडे ,डॉक्टर अभिजीत काळे, यांच्याकडे जगदंब प्रतिष्ठानचे प्रतिनिधी सागर रामसिंग कोल्हे यांच्यातर्फे सुपूर्द करण्यात आले.
हेही वाचा - राज्य सरकारला कोर्टाने फटकारलं? आशिष शेलारांची याचिका दाखल झाल्यानंतर माहिती
यावेळी विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, जुन्नरचे तहसीलदार हनमंत कोळेकर, बाजार समितीचे माजी संचालक दिलीप कोल्हे, बंधन बँकचे मॅनेजर आदित्य मराठे, तुषार डोके, अतुल आहेर,गणेश वाजगे, अशिष हांडे आदी उपस्थित होते.