शिक्षिकेची अघोरी शिक्षा, 5वीच्या विद्यार्थ्याला काढायला सांगितल्या 200 उठाबशा

शिक्षिकेची अघोरी शिक्षा, 5वीच्या विद्यार्थ्याला काढायला सांगितल्या 200 उठाबशा

मुलांनी धिंगा मस्ती करावी, खेळावं असंच अपेक्षीत आहे. मात्र याची जाणीव या शिक्षिकेला नाही का असा सवाल आता विचारला जात आहे.

  • Share this:

बुलडाणा 02 मार्च : शिक्षिकेने एका विद्यार्थ्याला एक अघोरी शिक्षा केल्याचं प्रकरण समोर आलंय. हा मुलगा 5व्या वर्गात शिकत असून या शिक्षेमुळे तो आजारी पडलाय. ओम देवेंद्र तळपते असं त्या मुलाचं नाव आहे. शेगाव तालुक्यातल्या तालुक्यातील पहुरजीरा येथील जि. प शाळेत हा प्रकार घडलाय. अशी शिक्षा करणाऱ्या शिक्षिकेवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी पालकांनी अधिकाऱ्यांकडे केलीय. ओम हा पहुरजीरा इथल्या जि. प. शाळेत शिकतो. तो 5 व्या वर्गात आहे. ओम हा धिंगाणा घालतो, गोंधळ करतो त्यामुळे शिक्षिका मनिषा शेंबडे यांनी त्याला 200 उठाबशा काढण्याची शिक्षा केली. त्या शिक्षेची अंमलबजावणी करताना लहानगा ओम चांगलाच भेदरून गेला. या शिक्षेचा त्याला त्रास झाल्याने तो आजारी पडला.

पालकांनी जेव्हा त्याला कारण विचारलं तेव्हा त्याने सगळी घटना सांगितली. त्यानंतर त्याच्या पालकांनी लेखी तक्रार शिक्षण अधिकारी आणि इतरांकडे केली आहे. या शिक्षिकेविरुद्ध तातडीने कारवाई करावी अशी मागणी या पालकांनी केलीय. ओम वर सध्या उपचार सुरु आहे.

हसत-खेळत दिलेलं शिक्षण हे सर्वात योग्य असते. त्यामुळेच विद्यार्थी जास्त चांगल्या पद्धतीने ग्रहण करतात असं सांगितलं जातं. मात्र असं सातत्याने सांगितलं जात असतानाच हा प्रकार समोर आल्याने पालकांनाही धक्का बसला आहे.

वंजारी युवक संघटनेने MPSCच्या कार्यालयात फेकली अंडी, बोर्डाला फसलं काळं

या वयात मुलांनी एकदम आदर्श राहावा असं अपेक्षीतच धरलं जाऊ नये. त्यांनी धिंगा मस्ती करावी, खेळावं असंच अपेक्षीत आहे.  मात्र याची जाणीव या शिक्षिकेला नाही का असा सवाल आता विचारला जात आहे. शिक्षकांनाही आता वेगळ्या प्रशिक्षणाची गरज असून विद्यार्थ्यांशी कसं वागावं याचं शिक्षण पुन्हा एकदा द्या अशी मागणीही पालकांनी आणि सामाजिक संघटनांनी केलीय.

हे वाचा...

हा काय डोक्यावर पडला का? अभिनेते शरद पोंक्षेंवर भडकले जितेंद्र आव्हाड

धक्कादायक!आदिवासी वसतिगृहातील स्वच्छतागृहात 18 वर्षांच्या विद्यार्थिनीची प्रसूती

 

First published: March 2, 2020, 4:10 PM IST
Tags:

ताज्या बातम्या