जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / हा काय डोक्यावर पडला का? अभिनेते शरद पोंक्षेंवर भडकले जितेंद्र आव्हाड

हा काय डोक्यावर पडला का? अभिनेते शरद पोंक्षेंवर भडकले जितेंद्र आव्हाड

हा काय डोक्यावर पडला का? अभिनेते शरद पोंक्षेंवर भडकले जितेंद्र आव्हाड

कट्टर सावरकरवादी असलेल्या पोंक्षे यांच्या वक्तव्यामुळे याआधीही अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 02 मार्च : ‘अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापेक्षा वीर सावरकरांचं योगदान श्रेष्ठ आहे,’ असं वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलं होतं. त्या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पोंक्षे यांना टार्गेट केलं असून, हा डोक्यावर पडला काय? काय बोलतो त्याचे त्यालाच कळते कि नाही माहित नाही अशी टीका त्यांनी पोंक्षे यांच्यावर केलीय. कट्टर सावरकरवादी असलेल्या पोंक्षे यांच्या वक्तव्यामुळे याआधीही अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात एका कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘मी सावरकर’ या वक्तृत्व स्पर्धेवेळी वाद झाला होता. या स्पर्धेच्या समारोपाला आलेल्या अभिनेते शरद पोंक्षे यांना पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या विरोधाचा सामना करावा लागला. त्यामुळे विद्यार्थी संघटनांच्या रोषाला बळी पडावं लागू नये म्हणून शरद पोंक्षे हे गुपचूप दुसऱ्या मार्गाने सभागृहात पोहोचले होते. शरद पोंक्षे हे ‘मी सावरकर’ या वक्तृत्व स्पर्धेच्या समारोपासाठी फर्ग्युसन कॉलेजमध्ये येणार हे कळताच पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी विरोध सुरू केला. तसंच त्यांच्या आगमनावेळी जोरदार घोषणाबाजीही केली होती. पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या घोषणाबाजीला अभाविपकडूनही घोषणाबाजी करून प्रत्युत्तर देण्यात आलं होतं.

चंद्रकांत पाटील म्हणजे भाजपचे ‘दादामियां’, शिवसेनेची सडकून टीका

कार्यक्रमापूर्वी पुरोगामी विद्यार्थी संघटनांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली. गांधीजींचा खून करणाऱ्या गोडसेचं समर्थन करणाऱ्या शरद पोक्षेंचा जाहीर निषेध, असे पोस्टर यावेळी विद्यार्थ्यांनी झळकावले. त्यामुळे कॉलेज परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला आणि पोलीस बंदोबस्तात कार्यक्रम सुरु करण्यात आला होता. आता या कार्यक्रमात त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

जाहिरात
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात