जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / होम क्वारंटाइन व्यक्तिचा संशयास्पद मृत्यू, PPE किट नसल्याने 2 तास मृतदेह रस्त्यावरच पडून

होम क्वारंटाइन व्यक्तिचा संशयास्पद मृत्यू, PPE किट नसल्याने 2 तास मृतदेह रस्त्यावरच पडून

होम क्वारंटाइन व्यक्तिचा संशयास्पद मृत्यू, PPE किट नसल्याने 2 तास मृतदेह रस्त्यावरच पडून

दवाखाण्यातून परत जाताना त्याला अस्वस्थ वाटून लागलं आणि तिथे तो बसल्यानंतर त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सांगितली जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुसद 20 मे: होम क्वारंटाइन असलेल्या एका व्यक्तिचा मंगळवारी संशयास्पद मृत्यू झाला. हा व्यक्ती रस्त्यावरच मृत्यूमुखी पडला होता. मात्र PPE किट आणि डॉक्टरच उपलब्ध नसल्याने मृतदेह तब्बल २ तासांपेक्षा जास्त काळ हा रस्त्यावरच पडून होता. या घटनेनं शहरात खळबळ उडाली असून प्रशासनाची तयारीही उघडी पडली आहे. मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग हा मोठ्या शहरांमधून येत असल्याने संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झालेला असताना प्रशासनाची मात्र काहीही तयारी नसल्याचं आढळून आलं आहे. पुसदजवळच्या हुडी इथं राहणारा हा व्यक्ति काही दिवसांपूर्वी अहमदनगरमधून आला होता. त्याच्या हातावर होम क्वारंटाइनचा शिक्का मारलेला होता. आरोग्य तपासणीसाठी तो हुडीवरून पुसदला ७ किमी चालत बायकोसह आला होता. शहरात आल्यानंतर दवाखाण्यातून परत जाताना त्याला अस्वस्थ वाटून लागलं आणि तिथे तो बसल्यानंतर त्याच ठिकाणी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सांगितली जात आहे. आरोग्य विभागाला माहीती कळाल्यानंतर रुग्णवाहिका तातडीने तिथे आली मात्र त्यात डॉक्टरच नव्हता. त्यानंतर PPE किटचाही नगरपरिषदेकडे अभाव असल्याने त्या मृतदेहाला हात लावण्यास कुणीच तयार नव्हते. त्यामुळे तब्बल दोन तास मृतदेह तसाच रस्त्यात पडून होता. हे वाचा - सगळ्यांसाठी 1 जून पासून सुरू होणार ट्रेन्स, दररोज धावणार 200 गाड्या

कोरोनावर उपचारासाठी भरावं लागणार बिल, या महापालिकेनं जाहीर केलं दरपत्रक मास्क घाला नाहीतर अटक होणार; ‘या’ देशाने घेतला कठोर निर्णय
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात