Home /News /maharashtra /

कोरोनावर उपचारासाठी भरावं लागणार बिल, या महापालिकेनं जाहीर केलं दरपत्रक

कोरोनावर उपचारासाठी भरावं लागणार बिल, या महापालिकेनं जाहीर केलं दरपत्रक

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्रतिदिन दर आकारण्यात येईल. त्यामध्ये डॉक्टर व्हिजिट, नर्सिंग, पीपीई किट, जेवण इत्यादीचा समावेश असेल असंही सांगण्यात आलं आहे.

    मुंबई, 19 मे : कोरोना झालेल्या रुग्णांवर मोफत उपचार केले जात असताना कल्याण डोंबिवली महापालिकेने यासाठीचं दरपत्रकच जाहीर केलं आहे. महापालिकेच्या किंवा महापालिकेनं कोरोनासाठी अधिग्रहण केलेल्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांना त्याचे बिल भरावे लागणार आहे. आधीच कोरोनाची भीती त्यात हा बिलाचा भारही रुग्णांवर पडणार आहे. यातील पिवळे व केसरी रंगाचं रेशन कार्ड असेलेल्या कोरोना रुग्णांना महात्मा फुले आरोग्य योजनेचा लाभ मिळेल. तर याशिवाय इतर रुग्णांना मात्र बिल द्यावं लागेल. कोरोनाची लागण झालेल्या आणि संशयित रुग्णांना भिवंडी बायपास इथल्या टाटा आमंत्रमध्य़े ठेवण्यात य़ेणार आहे. रुग्णाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास पिवळे व केसरी रंगाचे रेशन कार्ड असलेल्यांव्यतिरिक्त इतरांना रिपोर्ट आल्यापासून प्रतिदिन 500 रुपये आकरण्यात  येतील. यामध्ये भोजन, राहण्याची सोय आणि औषधांचा खर्च यांचा समावेश असेल. टाटा आमंत्रमधून रुग्णाला पुढे पाठवावं लागलं तर पिवळ्या आणि केसरी रंगाचे रेशन कार्ड असणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या डोंबिवलीतल्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्राधान्याने घेतलं जाईल. रुग्णांची प्रकृती गंभीर असेल तर त्यांना कल्याण पश्चिम इथं असलेल्या होलिक्रॉस रुग्णालयात दाखल कऱण्यात यावं. तसंच त्याच्या उपचाराचा खर्च महात्मा फुले आरोग्य योजनेतून करण्या येईल. पिवळे व केसरी रेशन कार्ड नसलेल्या रुग्णांना नियॉन वर आर आर रुग्णालयात पाठवले जाईल. तिथं जागा नसेल तर होलिक्रॉसमध्ये दाखल करण्यात येईल. अशा रुग्णांच्या उपचारासाठी वेगळे दर आकारण्यात येतील. हे वाचा धक्कादायक: ठाण्यातल्या कोरोना योद्ध्यांना 3 महिन्यांपासून पगारच नाही जनरल वॉर्डमध्ये उपचार घेणाऱ्यांसाठी 2800 रुपये प्रतिदिन इतके बिल आकारण्यात येईल. तर शेअर रूमसाठी 3200 आणि सिंगल रूमसाठी 3800 रुपये द्यावे लागतील. अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी 5 हजार तर व्हेंटिलेटरचे प्रतिदिन 2 हजार रुपये आकारण्यात येतील. यामधून पिवळे व केसरी रंगाचे रेशन कार्ड असलेल्या रुग्णांना वगळण्यात आलं आहे. हे वाचा : मुंबईत आतापर्यंत 800 मृत्यू, रुग्णसंख्या 22583; पुण्यातही रुग्ण वाढले रुग्णांना यामध्ये डॉक्टर व्हिजिट, नर्सिंग, पीपीई किट, जेवण इत्यादीचा समावेश असेल. तसंच औषधं, सर्जिकल साहित्य, लॅबची तपासणी याचा अतिरिक्त खर्च आकारण्यात येईल. यात 15 टक्के सूटही दिली जाईल. ज्यांचा विमा असेल त्यांबाबत रुग्णालयानी नेहमीच्या पद्धतीने प्रक्रिया पूर्ण केली जाईल. सरकारने अन्य काही दर निश्चित केल्यास तेसुद्धा लागू करण्यात येतील असं महापालिकेने सांगितलं आहे. टाटा आमंत्रचं काम उपअभियंता प्रमोद मोरे यांच्याकडे तर महात्मा फुले योजनेतील रुग्णांकरीता वैद्यकिय अधिकारी समीर सरवणकर यांच्याकडे जबाबदारी दिली आहे. हे वाचा : UAE च्या मदतीसाठी एक महिन्याचं बाळ घरी ठेवून गेलीय आई, भारतातील 88 नर्स दुबईत
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या