सगळ्यांसाठी 1 जून पासून सुरू होणार ट्रेन्स, दररोज धावणार 200 गाड्या

सगळ्यांसाठी 1 जून पासून सुरू होणार ट्रेन्स, दररोज धावणार 200 गाड्या

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर देशातली सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर देशभर प्रवासी अडकून पडले होते. त्या काळात फक्त माल वाहतूक सुरू होती.

  • Share this:

मुंबई 19 मे: लॉकडाऊन 4.0ची अंमलबजावणी सुरू असतानाच केंद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या १ जूनपासून सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. १ जूनपासून दररोज २०० नॉन एसी गाड्या धावतील आणि त्याची संख्या हळूहळू वाढवली जाईल असं त्यांनी म्हटलं आहे. या गाड्यांचं बुकिंग लवकरच सुरू केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं.

लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर देशातली सर्व वाहतूक बंद करण्यात आली होती. त्यानंतर देशभर प्रवासी अडकून पडले होते. त्या काळात फक्त माल वाहतूक सुरू होती. नंतर मजुरांसाठी श्रमीक ट्रेन्स सुरू करण्यात आल्या होत्या. तर ठिक ठिकाणी अडकून पडलेल्या लोकांसाठीही काही गाड्या चालविण्यात आल्या होत्या.

पण सगळ्यांना प्रतिक्षा होती ती सर्वसामान्य प्रवाशांसाठी ट्रेन्स केव्हा सुरू होतील याची. आता १ जून पासून ट्रेन्स सुरू होणार असल्याने सर्व सामान्य प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

आपला माणूस ! शेकडो किमी दूर अडकलेल्या लोकांची अंगावर शहारे आणणारी 'घरवापसी'

भारतात कोरोना व्हायरस बाधितांच्या (Coronavirus) संख्येने   96 हजारांचा आकडा पार केला आहे. असाच वेग राहिला तर भारत लवकरच १ लाखांचा आकडा पार करेल. असं झालं तर भारताचा जगातल्या त्या ११ देशांमध्ये समावेश होईल जिथे १ लाखांपेक्षा जास्त बाधित आहेत. पण Active रुग्ण असलेल्या ७ देशांमध्येही भारताचा समावेश होणार आहे.  स्पेन (Spain), इराण (Iran)सह फक्त चार देशांमध्येच भारतापेक्षा जास्त रुग्ण आहेत. मात्र तिथे Active रुग्णांची संख्या कमी आहे. त्यामुळे सरकारची काळजी वाढली असून सरकार तयारीला लागलं आहे.

हिजबुलच्या कमांडरसह 2 दहशतवाद्यांचा खात्मा, काश्मीरात सुरक्षा दलाला मोठं यश

 महाराष्ट्रातील कोरोनाचं थैमान काही थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. राज्यात आज तब्बल 2033 नवे रुग्ण आढळले असून यामध्ये राजधानी मुंबईतील 1185 रुग्णांचा समावेश आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातही राज्यातील स्थिती नियंत्रणात येत नसल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

First Published: May 19, 2020 10:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading