माद्रिद, 19 मे : कोरोनाव्हायरसपासून (Coronavirus) बचाव करण्याचा मार्ग म्हणजे मास्क लावणं. मात्र अनेक जण मास्क (mask) लावताना दिसत नाहीत. त्यामुळे आता मास्क न लावलेल्यांना अटक केली जाणार आहे आणि दंडही भरावा लागणार आहे. स्पेनमध्ये (Spain) असा कठोर नियम लागू करण्यात आला आहे. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणं बंधनकारक आहे, अशी घोषणा स्पेननं सोमवारी केली. जिथं 2 मीटर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं शक्य नाही, तिथं मास्क घालणं गरजेचं आहे, असं सरकारनं सांगितलं. द सनच्या रिपोर्टनुसार, स्पेनमध्ये ब्रिटिश नागरिक मास्क वापरण्याच्या आदेशाचं उल्लंघन करत आहेत. ब्रिटिशांना पब आणि बारमध्ये विना मास्क पाहण्यात आलं. 13 मार्चपासून घरात बंदिस्त असलेल्या लोकांना सूट मिळताच सर्वजण घराबाहेर पडलेत. हे वाचा - 4 गंभीर आजार तरी कोरोनापुढे मानली नाही हार; 84व्या वयात फक्त आठवणींनी लढा जिंकला स्पेनच्या आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं की, पुढील काही दिवसांत नव्या आदेशांबाबत सविस्तर माहिती दिली जाईल. स्पेनमधील विविध क्षेत्रातील प्रतिनिधींशी चर्चा केल्यानंतर स्पेन सरकारनं हा निर्णय घेतला आहे. Social Distancing चं उल्लंघन कराल तर टॉयलेट साफ करावं लागणार’ अनेक लोकं सोशल डिस्टन्सिंगचं वारंवार उल्लंघन करत आहेत. त्यामुळे अशा लोकांना आता टॉयलेट साफ करायची शिक्षा दिली जाणार आहे. इंडोनेशियामध्ये (Indonesia) अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. हे वाचा - UAE च्या मदतीसाठी एक महिन्याचं बाळ घरी ठेवून गेलीय आई, भारतातील 88 नर्स दुबईत गल्फ न्यूज ने दिलेल्या वृत्तानुसार, इंडोनेशियातील अधिकाऱ्यांनी सांगितलं की, सोशल डिस्टन्सिंगच्या आदेशाचं उल्लंघन केल्यास शिक्षा म्हणून टॉयलेट साफ करावे लागती. सुधारणा व्हावी यासाठी देण्यात आलेल्या शिक्षेपैकी एक शिक्षा आहे. कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखणं हा या शिक्षेमागील उद्देश आहे. अशाच पद्धतीनं मास्क न लावणाऱ्यांना 17 डॉलर्स दंड भरावा लागेल, असंही त्यांनी सांगितलं. संकलन, संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.