बच्चू कडू संतापले! म्हणाले, शेतकऱ्याला आत्महत्तेस प्रवृत्त करणाऱ्या सावकाराची होणार चौकशी

बच्चू कडू संतापले! म्हणाले, शेतकऱ्याला आत्महत्तेस प्रवृत्त करणाऱ्या सावकाराची होणार चौकशी

शेतकऱ्याने सावकाराच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली

  • Share this:

अमरावती, 5 जून: अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यात शशिकांत मानकर या शेतकऱ्याने सावकाराच्या मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. विशेष म्हणजे सदर शेतकऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी व्हिडीओ शूट केला होता. सावकाराचे पैसे देऊनही त्याने तगादा लावला आहे, अशी आपबिती शेतकऱ्यानं कथन केली होती.

हेही वाचा...कोरोनाबाधितांची लूट, अव्वाच्या सव्वा बिल आकारणारे हॉस्पिटल सरकारच्या रडारवर

या प्रकरणाची दखल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतली आहे. शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या सावकाराच्या संपत्तीची चौकशी होणार आहे, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली आहे.

राज्यमंत्री बच्चू कडू यांनी या घटनेची गंभीर दखल घेत आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांची भेट घेतली. सांत्वन केलं. अकोला येथील देशमुख या सावकारावर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्याच्या संपत्तीची चौकशी करण्यात येणार आहे. शेतकऱ्याचा फेरफार तलाठ्याने कसा केला, याचाही सखोल तपास करून शेतकऱ्याना न्याय देऊन जमीन परत दिली जाईल, अशी ग्वाही बच्चू कडू यांनी यावेळी दिली.

युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेला ठोकले टाळे

दरम्यान, पीक विम्यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. वर्धा जिल्ह्यातील बँकांना मागणीनुसार, 24 तासांत लागेल ते कागदपत्र पुरवण्याची हमी महसूल विभागाने दिली होती. त्यानुसार बँकेने कर्ज प्रकरण निकाली काढायला पाहिजे होते. हंगाम सुरू होऊनही कर्ज प्रकरण मंजूर झाले नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी वर्ध्याच्या युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखेला टाळे ठोकले. घोषणाबाजी करीत बँक प्रशासनाचा निषेध केला.

हेही वाचा... घात की अपघात? बंगल्यात जळालेल्या अवस्थेत आढळला उपजिल्हाधिकाऱ्यासह पत्नीचा मृतदेह

First published: June 5, 2020, 4:31 PM IST

ताज्या बातम्या