प्रसिद्धीसाठी हापापलेल्या आखाडा बाळापुर पोलिसांची रात्री च्या अंधारात फोटोग्राफी

प्रसिद्धीसाठी हापापलेल्या आखाडा बाळापुर पोलिसांची रात्री च्या अंधारात फोटोग्राफी

अवैध धंद्यावर नियंत्रण मिळविण्या ऐवजी अशाप्रकारे अंधारात स्वत:ची प्रसिद्धी मिळविण्यासाठी प्रयत्न करताहेत.

  • Share this:

कन्हैया खंडेलवाल, हिंगोली 8 फेब्रुवारी : प्रसिद्धीसाठी पोलीस कधी काय करतील हे सांगता येत नाही. असाच काहीसा प्रकार हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे घडला आहे. आखाडा बाळापूर पोलिसांनी भोसी गावांमध्ये अफुची शेती करणाऱ्या ठिकाणी धाड टाकून अफुची झाडे जप्त केले. खूप मोठी कारवाई केली आणि वरिष्ठांकडून दाद मिळविण्याच्या प्रयत्नात चक्क रात्रीच्या अंधारातच पोलिसांनी अफुची झाडं जप्त केल्याप्रकरणी फोटोग्राफी करुन स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचा आगळावेगळा प्रकार समोर आला आहे.

एकीकडे आखाडाबाळापुर पोलीस ठाण्याच्या क्षेत्रात गुन्हेगारी वाढत आहे, मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चालू असताना गुन्हे आणि अवैध धंद्यावर नियंत्रण मिळविण्या ऐवजी अशाप्रकारे अंधारात स्वत:ची प्रसिद्धी मिळविण्यासाठी रात्रीच्या अंधारात पोलिसांनी केलेल्या या प्रतापाची चविष्ट चर्चा मात्र जिल्हाभर होत आहे.

हेही वाचा...

राष्ट्रवादीच्या नेत्याला धक्काबुक्की, नाशिक महामार्गावर वाहतूक विस्कळीत

VIDEO ते बघ खाली काय दिसतंय...30 हजार फुटांवर आकाशात गुरुंच्या भूमिकेत शरद पवार

शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर बलात्काराचा आरोप, अश्लिल Video पाठवून द्यायचा त्रास

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 8, 2020 11:08 AM IST

ताज्या बातम्या