शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर बलात्काराचा आरोप, पीडितेला अश्लिल VIDEO पाठवून द्यायचा त्रास

शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर बलात्काराचा आरोप, पीडितेला अश्लिल VIDEO पाठवून द्यायचा त्रास

नगरसेविकेच्या पतीने पीडित महिलेला ब्लॅकमेल केले आणि APMC मार्केटच्या येथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला

  • Share this:

कल्याण, 8 फेब्रुवारी : महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा अग्रणी आहे. गेल्या काही दिवसांमध्ये महिलेला पेटवणे, तिला मारहाण आणि बलात्काराच्या घटना समोर येत आहे. कल्याणमधील शिवसेना नगरसेविकेच्या पतीवर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या आरोपीने महिलेचा अश्लिल व्हिडिओ दाखवून तिला ब्लॅकमेल केले आणि तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

कोळसेवाडी पोलिसांनी सांगितल्यानुसार आरोपी साईनाथ तारे हे नगरसेविका मनिषा तारे यांचे पती आहेत. आरोपीने पीडित महिलेला आक्षेपार्ह व्हिडिओ दाखवून ब्लॅकमेल करीत होता. या आरोपीने महिलेवर तिच्याच महागड्या कारमध्ये बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी या महिलेला सप्टेंबर 2018 मध्ये बिझनेस प्रपोजलसाठी  कल्याण मेट्रो मॉलमध्ये भेटला होता. मात्र महिलेला ते बिझनेस प्रपोजल आवडलं नाही आणि तिने या करारासाठी नकार दिला.

पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीत तिने म्हटले आहे की, आरोपीने ब्लॅकमेल केले असून APMC मार्केटच्या येथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला. इतकचं नाही तर आरोपीने महिलेला तिला, तिच्या पतीला आणि 5 वर्षांच्या मुलाला जीवेमारण्याची धमकी दिली होती. आणि तिच्या मनाविरुद्द नोटरी पेपरवर स्वाक्षरी घेतली होती. आरोपी पीडित महिलेला अश्लिल व्हिडिओ पाठवत असे आणि तिला समाज माध्यमांवरुनही संदेश पाठवयाचा. या प्रकरणात तक्रार दाखल करण्यात आली असून याचा तपास सुरू करण्यात आल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहुराव साळवे यांनी सांगितले.

मतदानापूर्वीच दिल्ली हादरली! महिला सब-इन्सपेक्टरची गोळी घालून हत्या

प्रवचनासाठी महाराज आला आणि दुसऱ्याची तरुण बायको घेऊन पळून गेला

First published: February 8, 2020, 9:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading