मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

VIDEO ते बघ खाली काय दिसतंय...शरद पवारांनी विमानात 30 हजार फुटांवरून तरुणाला दिला गुरुमंत्र

VIDEO ते बघ खाली काय दिसतंय...शरद पवारांनी विमानात 30 हजार फुटांवरून तरुणाला दिला गुरुमंत्र

या संपूर्ण प्रवासात पवार त्या तरुणाशी अगदी वडिलधाऱ्यां प्रमाणं संवाद साधत होते. त्यांनी त्या तरुणाची विचारपूस केली.

या संपूर्ण प्रवासात पवार त्या तरुणाशी अगदी वडिलधाऱ्यां प्रमाणं संवाद साधत होते. त्यांनी त्या तरुणाची विचारपूस केली.

या संपूर्ण प्रवासात पवार त्या तरुणाशी अगदी वडिलधाऱ्यां प्रमाणं संवाद साधत होते. त्यांनी त्या तरुणाची विचारपूस केली.

    मुंबई 8 फेब्रुवारी : माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना महाराष्ट्राची खडान् खडा माहिती आहे असं म्हटलं जातं. पवारांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्याला किमान दोन वेळा तरी भेट दिलेली आहे. राज्यातल्या कानाकोपऱ्यात असलेल्या कार्यकर्त्यांना नावानीशी ओळखणारे नेते म्हणूनही ओळखले जातात. राजकारणात पवारांच्या या गुणाबद्दल त्यांचे विरोधकही त्यांना श्रेय देतात. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय. शरद पवार हे दिल्लीतू मुंबईला येत असताना त्यांच्या शेजारी परभणीतला एक तरुण प्रवास करत होता. पवार आपल्या शेजारी आहेत या कल्पनेनच तो तरुण हरखून गेला आणि पवारांनीही अगदी सहजपणे त्याला विमानातून जमिनीचा इतिहास सांगितला. तो VIDEO आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. दिल्ली ते पुणे या विमान प्रवासात शरद पवारांच्या शेजारी बसलेल्या तरुणाने पवारांशी झालेल्या संभाषणाचा व्हिडीओ तयार केलाय. या संपूर्ण प्रवासात पवार त्या तरुणाशी अगदी वडिलधाऱ्यां प्रमाणं संवाद साधत होते. त्यांनी त्या तरुणाची विचारपूस केली. तो काय करतो, कुठे गेला होता, शिक्षणाचं काय? घरी कोण असतं? शेतात काय आहे? पुढे काय करणार आहेस? असं सगळं विचारलं. प्रवचनासाठी महाराज आला आणि दुसऱ्याची तरुण बायको घेऊन पळून गेला पवारांच्या या संवादानंतर त्या तरुणाला असलेलं टेंशन थोडं कमी झालं आणि तोही साहेबांशी संवाद साधू लागाला. विमान जसं पुण्याच्या जवळ येत होतं तसं पवार त्याला जमिनीवर काय आहे. तो भाग कुठला आहे हे सगळं सजावून सांगत आहेत असं दिसतंय. पुण्याजवळचं चाकण, तिथले उद्योग, जमिनींचा प्रश्न, शेतकरी असं सगळं समाजकारण पवारांनी त्याला सांगितलं. एकदा तर भरकटलेल्या हेलिकॉप्टरच्या पायलटलाच शरद पवारांनी योग्य रस्ता दाखवला होता अशीही आठवण पवारांच्या जवळचे नेते सांगत असतात. हा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर टाकल्यानंतर त्यावर भरभरून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री जयंत पाटील यांनीही हा व्हिडीओ Retweet करत आपल्या भावना व्यक्त केल्यात. OMG! पुण्यात बाहुबली थाळी; सगळं संपवलंत तर मिळेल लाईफटाईम फ्री जेवण विमानात तरुणाशी संवाद साधणारा आदरणीय पवार साहेबांचा व्हिडीओ पाहिला. साहेब म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठच ! या विद्यापीठातून कोणीच रिकाम्या हाताने जात नाही. समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधत विचारांची देवाणघेवाण करणारा त्यांचा हा स्वभाव आम्हा सर्वांसाठीच आदर्श आहे! अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केलीय.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    Tags: Sharad pawar

    पुढील बातम्या