ॲक्सिस बँकेचा उलटा कारभार, अमरावतीच्या शेतकऱ्याविरुद्ध काढलं कोलकाता कोर्टाचं वॉरंट

ॲक्सिस बँकेचा उलटा कारभार, अमरावतीच्या शेतकऱ्याविरुद्ध काढलं कोलकाता कोर्टाचं वॉरंट

अमरावतीच्या शेतकऱ्याला कोलकत्यात जाऊन वॉरंट रद्द करून घेणं हे परवडणारं आहे का? असा सवाल आता विचारला जातोय.

  • Share this:

अमरावती 09 मार्च : अंजनगाव तालुक्यातील गावंडगाव बु. येथील एका कोरडवाहू शेतकऱ्यांच्या नावाने कोलकाता कोर्टाचे अटक वारंट निघाल्याने गावंडगावात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. 2016 मध्ये अंजनगाव तालुक्यातील गावंडगाव बु. येथील अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी नितीन विठ्ठलराव गावंडे यांनी अमरावती येथील अॅक्सिस बँकेतून लहान ट्रॅक्टरसाठी कर्ज घेतले होते. सदर शेतकऱ्यांनी कर्जाची पूर्ण परतफेड  केली. ट्रॅक्टर बाबत ॲक्सिस बँकेचे कोणतेही कर्ज थकीत नसताना  रहिमापुर पोलीस ठाण्यात नितीन गावंडे यांच्याविरुद्ध  अटक वारंट आल्याने खळबळ उडाली आहे.

कोलकत्यात जाऊन 27 मार्चपर्यंत अटक वॉरंट रद्द करून आणावे असे शेतकऱ्याला पोलिसांनी सांगितल्याने गावंडे संकटात सापडले आहेत. शेतकरी नितीन गावंडे व त्याच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाचा धसका बसला असून सदर शेतकऱ्याचे संपूर्ण कुटुंबच चिंतेत पडले असून मानसिक तणावाखाली जगत आहे. ॲक्सिस बँकेच्या मॅनेजरवर कारवाई करावी अशी मागणी या शेतकऱ्यांकडून होत आहे.

शेतकऱ्यांनी ही सगळी माहिती स्थानिक ब्रँच मॅनेजरला दिली आहे. त्यांनी नागपूरला वरिष्ठांच्या कानावर ही सर्व माहिती घातली आहे. या शेतकऱ्याला तातडीने दिलासा द्यावा अशी मागणीही होत आहे. अमरावतीच्या शेतकऱ्याला कोलकत्यात जाऊन वॉरंट रद्द करून घेणं हे परवडणारं नाही त्यामुळे तातडीने कार्यवाही व्हावी अशी मागणीही केली जात आहे.

हेही वाचा...

जगभरात दहशत माजवणाऱ्या कोरोनासुराचं मुंबईत होणार दहन

पोटाची खळगी भरण्यासाठी महिला करतात घातक काम.. चेहरा असा झाला विद्रुप

4 वर्षांपूर्वी जळालं होतं घर,अद्यापही स्मशानात राहून करावा लागतोय जीवनाशी संघर्ष

 

 

First published: March 9, 2020, 9:21 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading