ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे. त्याची लगेच पाहणी करून पंचनामे केले जाणार आहे. पंचनामे केल्यानंतर तातडीने मदत दिली जाणार आहे. यावर्षी सोयाबीन उत्पादक शेतकरी पूर्णपणे हताश झाला आहे. जे पेरले ते उगावले नाही आणि हातात जी पिकं हातात आली, ती मेलेली होती, त्यामुळे राज्य सरकारमधील कृषी खाते हे झोपलेले आहे की का? असा सवाल उपस्थितीत करत बच्चू कडूंनी महाविकास आघाडीला घरचा अहेर दिला. जेव्हा बियाणे तयार होते तेव्हा त्यात काही बदल केले जातात की काय असा संशय आहे. सरकारच्या महाबीज कंपनीने 2 ते 3 हजार रुपयात बाजारातीलच निकृष्ट दर्जाचं बियाणे घेऊन शेतकऱ्यांना 8 हजार रुपये भावानं विकले असावे, असा आरोपच बच्चू कडू यांनी केला. लालपरीने प्रवास करताना काळजी घ्या, औरंगाबादेत 10 जण आढळली कोरोनाबाधित! तसंच, 'गेल्या 50 वर्षांपासून हेच सुरू आहे. त्यामुळे बोगस बियाणे बनवणाऱ्या कंपनीच्या मालकालाच चोपल पाहिजे' असे म्हणत बच्चू कडूंनी आपल्या स्टाईलने कंपन्यांना सज्जड इशारा दिला. त्याचबरोबर, शेतकऱ्यांच्या शेताची पाहणी करून त्वरित नुकसानग्रस्त झालेल्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेशही बच्चू कडू यांनी दिले आहे.राज्यातील कृषी खाते झोपले की काय? राज्यमंत्री बच्चू कडू यांचा सरकारला घरचा अहेर pic.twitter.com/CLQqTPVTAT
— News18Lokmat (@News18lokmat) August 23, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.