औरंगाबाद, 23 ऑगस्ट : गेल्या 5 महिन्यांपासून बंद असलेली लालपरी अर्थात एसटी वाहतूक राज्यात सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठीकठिकाणी एसटी बसला कमी जास्त प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. परंतु, औरंगाबादेत एसटी बसने दाखल झालेल्या प्रवाशांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे.
दैनिक लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, औरंगाबाद शहराच्या मध्यवर्ती बस स्थानकावर जवळपास 261 प्रवासी दाखल झाले होते. या सर्व प्रवाशांची अँटिजन चाचणी करण्यात आली होती. या चाचणीमध्ये 10 जणांचे रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आढळून आले आहे.
आनंदाची बातमी! 73 दिवसांत भारतात उपलब्ध होणार कोरोनाची लस
औरंगाबाद शहरात रेल्वे स्थानकावर महापालिकेकडून अँटिजन चाचणी घेण्यात येते. पण आता एसटी बस सेवा सुरू झाल्यानंतर स्थानकावर चाचणी घेण्यात येत आहे. शनिवारी संध्याकाळपर्यंत आलेल्या प्रवाशांची चाचणी करण्यात आली. यात 261 प्रवाशांची चाचणी घेण्यात आली होती, यात 10 जण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहे. जे प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे, अशांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
राशीभविष्य : वृषभ आणि कर्क राशीच्या व्यक्तींना प्रवास करताना सावधगिरी बाळगा
कोरोनामुळे राज्यात लागू झालेल्या लॉकडाउनमुळे तब्बल 5 महिने एसटी बससेवा बंद होती. अखेर 20 ऑगस्टपासून जिल्ह्याअंतर्गत प्रवास करण्यास राज्य सरकारने हिरवा कंदील दिल्यानंतर एसटी बसेस धावण्यास सुरुवात झाली.
औरंगाबादेत जिल्ह्यात 15363 कोरोनामुक्त
दरम्यान, जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 211 जणांना (मनपा 125, ग्रामीण 86) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 15363 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. शनिवारी दिवसभरात एकूण 395 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 20439 झाली आहे. आजपर्यंत एकूण 629 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4447 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
सकाळनंतर 249 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 43, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 51 आणि ग्रामीण भागात 27 रुग्ण आढळलेले आहेत.