तुकाराम मुंडे इन अॅक्शन : नागपूर महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांना घेतलं फैलावर; पारा चढला कारण...

तुकाराम मुंडे इन अॅक्शन : नागपूर महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांना घेतलं फैलावर; पारा चढला कारण...

नागपूर महापालिकेत बदली होऊन गेलेले आयुक्त तुकाराम मुंढे शिवजयंतीच्या कार्यक्रमादरम्यान कर्मचाऱ्यांवर संतापले. कारण ठरली मोबाईलची रिंग आणि....

  • Share this:

नागपूर, 19 फेब्रुवारी : महाराष्ट्रभर आपल्या कडक कारभारामुळे चर्चेत असणारे IAS ऑफिसर तुकाराम मुंढे यांची नुकतीच नागपूर महापालिकेत बदली झाली. त्यांच्या शिस्तीचा आणि कडक कारभाराचा अनुभव महापालिका कर्मचाऱ्यांना शिवजयंतीच्या दिवशीच अनुभवायला मिळाला. शिवजयंती कार्यक्रमातच तुकाराम मुंढे कर्मचाऱ्यांवर भडकले. त्याला कारण ठरला वाजणारा मोबाईल फोन आणि जीन्स.

नागपूर महापालिकेत शिवजयंतीच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम सुरू असतानाच एकाचा मोबाईल फोन वाजता. फोनची रिंग वाजत राहिल्यामुळे मुंढे यांचा पारा चढला. त्यांनी या बेशिस्तीबद्दल आणि शिष्टाचार न पाळल्याबद्दल तिथेच सर्व कर्मचाऱ्यांची शाळा घेतली. त्यातच एक जण जीन्स घालून ऑफिसला आलेला दिसला. त्यामुळे मुंढे यांचा पारा आणखी चढला. कार्यालयीन शिष्टाचाराचा भाग म्हणून फॉर्मल वेशात यायच्याऐवजी जीन्समध्ये आल्याने मुंढेसाहेब संतापले.

मुंढे नागपूरला जॉइन झाल्यानंतर लगेचच त्यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचा सपाटा लावला आहे. पहिल्या दिवशीपासूनच त्यांनी उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना कडक शब्दांत सुनावलं होतं. त्यांनी आपल्या पहिल्याच मीटिंगमध्ये शिस्तबद्ध कामाविषयी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. उशिरा येणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना खडसावलं होतं.

अगोदरच तुकाराम मुंढेंच्या कारभारावर काही नगरसेवक नाराज आहेत.  विकासकामांना मुंढे आल्यापासून स्थगिती मिळाल्याचा भाजपच्या काही नगरसेवकांचा आरोप आहे. त्यामुळे आधीपासूनच नागपूर महापालिकेत मुंढे आल्यापासून वातावरण टाइट आहे. त्यात आता कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचं काम मुंढेंनी हाती घेतल्यानं पालिकेतलं वातावरण बदललं आहे.

------------------------------

अन्य बातम्या

'एल्गार'वरून शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद आहेत का? अजित पवारांनी केला खुलासा

'राजकीय पुनर्वसन' वादाच्या भोवऱ्यात, शिवसेनेने घेतले या दोन मंत्र्यांची राजीनामे

औरंगाबादेत भाजपला खिंडार, भाजपच्या माजी शरहाध्यक्षांनी बांधले 'शिवबंधन'

First published: February 19, 2020, 7:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading