Home /News /maharashtra /

माझी दोन नंबरची कामे नाहीत, नागपूरमध्ये मुंढे किंवा कुणीही आलं तरी फरक पडत नाही- फडणवीस

माझी दोन नंबरची कामे नाहीत, नागपूरमध्ये मुंढे किंवा कुणीही आलं तरी फरक पडत नाही- फडणवीस

'कुणी विरोधात बोलले तर त्याच्या मागे बीएमसीला लावलं जातं. महाराष्ट्रात असं सुडाचं राजकारण कधी झालं नाही.'

  नागपूर 25 सप्टेंबर: आपल्या कामाच्या धडाकेबाज स्टाईलसाठी प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे यांची नागपूरहून झालेली बदली चर्चेचा विषय ठरली होती. भाजपचं वर्चस्व असलेल्या महानगर पालिकेवर वचक ठेवण्यासाठीच त्यांना पाठवलं गेलं असंही बोललं जातं होतं. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर आपली भूमिका स्पष्ट केली. फडणवीस म्हणाले, मला त्रास देण्यासाठीच त्यांची नियुक्ती केली जरी असेल तरी माझ्यावर काहीही परिणाम झाला नाही. याचं कारण म्हणजे माझी दोन नंबर्सची कामे नाहीत. त्यामुळे तुकाराम मुंढे काय किंवा अन्य कुणीही आला तरी मला फरक पडत नाही. हे सरकार सुडाचं राजकारण करते आहे असा आरोपही त्यांनी केला. मीडिया, विरोधीपक्ष, सोशल मीडिया यावर आपल्या विरोधात कुणी बोलूच नये असं सरकारला वाटतं. कुणी विरोधात बोलले तर त्याच्या मागे बीएमसीला लावलं जातं. महाराष्ट्रात असं सुडाचं राजकारण कधी झालं नाही, असं मतही त्यांनी व्यक्त केलं. शुक्रवारी मुंबईत बोलतांना फडणवीस काय म्हणाले? शेतकरी विधेयकाची अमलबजावणी न करणे हे शेतकरी विरोधी आहे. हे निव्वळ राजकारण आहे. हे इतके दुट्टपी आहेत की काँग्रेसने 2017च्या जाहीरनाम्यात आम्ही जर सत्तेत आलो तर हे करू असं म्हटलं होतं. जर सत्तेत आलो नाही तर हे करू देणार नाही असेही म्हटले पाहिजे होते. आता शेतकरी उत्तर देतील. त्यांना अमलबजावणी करावी लागेल. चिंताजनक! कोरोनापासून बरे झाल्यावर हृदयाचे आजार होण्याचं प्रमाण वाढलं निवडणूक आयोगाने सांगितल्याप्रमाणे कोरोना काळातली बिहारची निवडणूक एक आव्हान आहे. मला विश्वास आहे की मोदीजींवर तिथल्या सामान्य लोकांचा विश्वास आहे. नितीश कुमार आणि सुशील मोदींवर लोकांचा विश्वास आहे. प्रचंड मोठा विजय एनडीएला मिळेल याचा विश्वास आहे

  तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Devendra Fadnavis, Tukaram mundhe

  पुढील बातम्या