Home /News /coronavirus-latest-news /

चिंताजनक! कोरोनापासून बरे झाल्यावर हृदयाचे आजार होण्याचं प्रमाण वाढलं, संशोधनातून गंभीर बाब आली समोर

चिंताजनक! कोरोनापासून बरे झाल्यावर हृदयाचे आजार होण्याचं प्रमाण वाढलं, संशोधनातून गंभीर बाब आली समोर

कोरोना (Coronavirus)च्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांना नंतरही काही आजार जडत असल्याचं गंभीर चित्र अमेरिकेतील एका अभ्यासातून समोर आलं आहे. यात विशेषतः हृदयाशी संबधित तक्रारी समोर येत आहेत.

    युनायटेड स्टेट्स, 25 सप्टेंबर : कोरोना (Coronavirus)च्या आजारातून बरे झालेल्या रुग्णांना नंतरही काही आजार जडत असल्याचं गंभीर चित्र अमेरिकेतील एका अभ्यासातून समोर आलं आहे. यात विशेषतः हृदयाशी संबधित तक्रारी समोर येत आहेत. अमेरिकेतील वॉल स्ट्रीट जर्नलने (WSJ) याबाबतची बातमी दिली आहे. हा अभ्यास करणाऱ्या संशोधकांच्या मते कोरोना काहींच्या शरीरात हृदयाची जळजळ, धाप लागणं, छातीत दुखणे आणि धडधड वाढणे अशी काही लक्षणं सोडून जात आहे. विशेष म्हणजे ज्यांना कोरोनाची गंभीर लक्षणं नाहीत त्यांच्यातही नंतर ही लक्षणं दिसत आहेत. 'मुळात आपण ज्या हृदय-स्नायूंच्या पेशींसह जन्माला आलो आहोत त्यासह आपण मरतो. त्यामुळे या स्नायूंना कोणतीही इजा पोहोचली की त्याचा परिणार हृदयाच्या कार्यक्षमतेवर होतो', असं मत वॉशिंग्टन विद्यापीठातील कार्डिओव्हॅस्क्युलर बायॉलॉजी विभागाचे संचालक चार्ल्स मरी यांनी व्यक्त केले आहे. फ्यू तसंच इतर काही विषाणूंच्या संसर्गाने हृदयाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो, काही प्रकरणामध्ये हृदयाचं कार्य थांबू शकतं. कोरोनाने मृत्यू झालेल्यांचं शवविच्छेदन करणं, लागण झालेल्यांच्या हृदयाची तपासणी करणं, कोरोनातून बरं झालेल्यांची तपासणी करणं अशा अभ्यासातून कोरोना हा बाधित व्यक्तीच्या हृदयाच्या कार्यावर परिणाम करतो हे समोर आलं आहे. (हे वाचा-सावधान! कॅनडा, ब्रिटनमध्ये आली Coronavirus ची दुसरी लाट; मुंबईत काय परिस्थिती?) असं असलं तरी हे सर्व निष्कर्ष प्राथमिक असल्याचंही संशोधकांचं म्हणणे आहे. कोणत्याही निष्कर्षांवर पोहोचण्यासाठी अधिक अभ्यास आणि तपासाची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. दोन पद्धतीने हा विषाणू हृदयावर परिणाम करू शकतो एक म्हणजे प्रतिकारक्षमतेवर आघात आणि दुसऱ्या शक्यतेनुसार विषाणू पेशीत प्रवेश करत असल्याने तो थेट हृदयाच्या पेशींना इजा पोहोचवू शकतो यामुळे पेशींवर परिणाम होतो. पेशींना संक्रमित केल्यानंतर त्यांची प्रतिकृती हा विषाणू बनवू शकतो, हृदयाला नियंत्रित करण्याचं पेशींचं कार्य बाधित होऊन हृदयाचे ठोके अनियंत्रित होऊ शकतात. आणि शेवटी हा विषाणू पेशींना मारून टाकतो त्यामुळे गंभीर परिणाम उद्भवतात. (हे वाचा-या देशात आता कुत्र्यांच्या मदतीने ओळखणार कोरोनाबाधित रुग्ण,वाचा कशी करणार तपासणी) युरोपीय श्वसन संस्थेच्या अभ्यासक संस्थेने सप्टेंबरच्या सुरुवातीला एक अभ्यास प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार कोरोना तुमच्या फुफ्फुसांवर आणि हृदयावर परिणाम करतो. पण अनेकांमध्ये काळानुरूप हे परिणाम हानिकारक ठरत नाहीत व रुग्ण बरे होतात. या संशोधनातून महत्त्वाचा पैलू समोर आला असला तरीही अजून दीर्घकाळ संशोधन झाल्यास आणखी महत्त्वाची माहिती आपल्याला कळू शकेल. तोपर्यंत हृदयाची काळजी घेत राहणं गरजेचं आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus, Coronavirus symptoms

    पुढील बातम्या