मुंबई, 19 मे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात कमालीचा बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसाचा जोर कमी होताच उष्णता वाढत आहे. एकीकडे काही भागांमध्ये पाऊस तर काही शहरांमध्ये कमालीची तापमान वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आजपासून राज्यात पुढचे काही दिवस तापमानाचा पारा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचं म्हटलं आहे.
एकीकडे बंगालच्या उपसागरात अम्फान चक्रीवादळ आल्यामुळे उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये तुफान वादळी-वाऱ्यासह पाऊस होत आहे. तर दुसरीकडे उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांमुळे गुजरात, राजस्थान आणि महाराष्ट्रातील विदर्भात तापमानाचा पारा वाढणार असून उष्णतेची लाट येऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मुंबईसह कोकणात ढगाळ वातावरण राहणार असून काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतील असं सांगण्यात आलं आहे.
हे वाचा-काही तासांतच AMPHAN चक्रीवादळ घेणार रौद्र रुप, ओडिशा आणि बंगाल हाय अलर्टवर
सोमवारी करण्यात आलेली तापमानाची नोंद
पुणे- 38.8
धुळे- 42.2
जळगाव- 44.0
कोल्हापूर- 37.0
महाबळेश्वर- 30.0
मालेगाव- 41.4
नाशिक- 36.3
निफाड- 35.1
सांगली- 37.0
सोलापूर- 43.3
डहाणू- 34.3
सांताक्रूझ- 34.0
रत्नागिरी- 34.9
औरंगाबाद- 40.6
परभणी 42.4
नांदेड- 41.0
अकोला- 43.8
अमरावती- 41.4
बुलडाणा- 40.2
ब्रह्मपुरी- 39.5
चंद्रपूर- 40.0
गोंदिया- 40.8
नागपूर- 41.7
वर्धा- 40.0
सोमवारी पुन्हा एकदा कमालीचं तापमान वाढल्यानं नागरिक उकाड्यानं हैराण झाले. जळगावचे 44 तर नागपूर शहराचे तापमान 42 डिग्री सेल्सियस पर्यंत गेले. अकोला व यवतमाळ येथे येत्या चार दिवस उष्माघाताचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मेच्या शेवटच्या दोन आठवड्यांत सर्वात जास्त उन्हाचे चटके बसणार आहेत. अकोला आणि यवतमाळ जिल्ह्यातील एक-दोन ठिकाणी 19 ते 22 मे दरम्यान उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
हे वाचा-फक्त 12 दिवसात तब्बल 50 हजार नवीन रुग्णांची नोंद, असा वाढला कोरोनाचा ग्राफ
हे वाचा-महिला SPचीं कमाल, रात्री 12 वाजता भुकेल्या मजुरांना स्वयंपाक करून दिलं जेवण
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.